नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्ष पुर्ण झाली आहेत. तरी अजून आम्ही जाती-पातीचे राजकारण विसरलो नाहीत. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या सुगाव या गावात एका श्रीमंत कुटूंबातील युवतीसोबत प्रेम करणे एका गरीब कुटूंबातील युवकाला महागात पडले. त्याची मारत-मारत काढलेली धिंड त्याच्या वर्णी लागली आणि त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. लिंबगाव पोलीसांानी मुलीकडच्या सात जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.काय शिकलो आम्ही, काय जगतो आहोत आम्ही आजही याचा विचार सर्वंकषपध्दतीने होण्याची गरज आहे.
गुरूवारी सकाळी सुगाव येथे एक भयंकर प्रकार घडला. गावात राहणाऱ्या शिंदे कुटूंबातील आई-वडील शेतात गेल्यानंतर त्यांचा 19 वर्षीय मुलगा नितीन प्रभु शिंदे याने आत्महत्या केली. यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार थुगाव येथील एका युवतीसोबत नितीनचे प्रेम संबंध होते. पण या प्रेम संबंधाची माहिती गावकऱ्यांना मिळाली तेंव्हा त्यांनी हे प्रकरण आगीला तेल टाकून वाढविले. प्रभु शिंदे आपल्या मुलाखतीत सांगतात मुलगी तयार होती, मुलीचे आई-वडील तयार होते पण त्यानंतर त्यांनी नितीनला केली मारहाण ही वेगळेच प्रकरण तयार करत होती. म्हणून आम्ही मुलीला सुध्दा समजावून सांगितले की, तुमच्या-आमच्या घरात सोयरीक होवू शकत नाही. पण मुलगी सुध्दा मी आत्महत्या करेल अशा धमक्या देवू लागली होती.
मुलाच्या वडीलांची मुलाखत…
तीन-चार वर्षापुर्वी ते दोघे दहावी वर्गात शिकत होते आणि तिच ओळख पुढे प्रेमात बदलली. सहा महिन्यापुर्वीपासून हा त्यांच्या प्रेमाचा विरोध सुरु झाला होता. 18 मार्च रोजी नितीन घरी येत असतांना मुलीच्या घरच्यांनी त्याला मारहाण केली होती. आम्ही देशमुख आहोत, तुम्ही पाटील आहात तुमची औकात नाही, तुला चिरुन टाकतो अशा धमक्या दिल्या. या प्रकरणातील मुलीचे वडील ज्ञानदेव केशवराव भोसले यांनी मुलाला फोन करून अगोदर गोड-गोड बोलत तुझी सोयरीक करून देणार आहे असे सांगितले आणि नंतरच्या फोनमध्ये त्याला चिरुन टाकण्याची धमकी दिली. ही रेकॉर्डींग मयत नितीन शिंदेच्या फोनमध्ये उपलब्ध आहे. यानंतर 20 मार्च रोजी नितीनने आपल्या घरातील पंख्याला गळफास लावण्याअगोदर मुलीला शेवटचा संदेश पण केला आहे. आणि मी आता तुला भेटू शकणार नाही, बोलू शकणार नाही असे त्या संदेशात लिहिले आहे.
फोन रेकॉर्डींग क्रं.1
फोन रेकॉर्डींग क्रं.2
Audio Playerप्रभु शिंदे यांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीसांनी ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जून भोसले, संतोष भोसले, नितीन भोसले यांच्यासह मुलीला सुध्दा या प्रकरणात आरोपी करून भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 115(2), 352(2), (3), 126(2), 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 27/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बोधनकर हे करीत आहेत.
मुलाने मुलीला केलेला शेवटचा संदेश…
भारताच्या स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर अनेक चर्चा झाल्या. त्यात महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल विशेष महत्व देण्यात आले. एखादा युवक आणि युवती हे 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना स्वत: निर्णय घेता येतो असा कायदा आहे. पण सुगाव येथे घडलेल्या घटनेतून आजही जातीभेद शिल्लकच आहे हेच दिसते. लग्ना करा किंवा न करा हा वेगळा विषय होता. पण त्या युवकाला मारहाण करून त्याची बेअब्रु करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंत त्याला त्रास देण्यात यावा हा अशा प्रकरणातील पर्याय नव्हे.