शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केलेल्या तीन मिनिटांच्या भाषणाने भारतीय जनता पार्टीची हवा गुल केली आहे. आजच्या परिस्थितीचे वर्णन करतांना संजय राऊत यांनी नई लाशे बिछाने के लिए गडे मुडदे उखाडे जा रहे है। या हिंदी वाक्यापासून सुरूवात केली. या शब्दांना जोडत त्यांनी नागपूर येथे घडलेली दंगल आणि सध्या देशात सुरू असलेले पोलीस राज्य याचा उल्लेख करून आपले मुद्दे मांडले.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलतांना जुन्या मुडद्यांना उकरून काय मिळणार आहे. पण आजच्या परिस्थितीत 400 वर्षापुर्वीच्या औरंगजेबाचा विषय काढून काय साध्य होणार आहे. यापुर्वीच मागील अडीच वर्षापासून मणीपुर हे राज्य जळत आहे. मागील काही वर्षापासून देशात पोलीस राज्य सुरू आहे. मुळात पोलीसांचे काम कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे आहे. परंतू सध्याच्या परिस्थिती खासदार, आमदार यांना खरेदी करणे हे सुरू आहे. त्याच्यासाठी पोलीस आणि इतर संस्थांचा वापर होत आहे.
ज्यांना औरंगजेबांची कबर उकडून टाकायची असेल त्यांनी ती जरुर कुदळ आणि फावडा घेवून उकडावी. परंतू त्यासाठी आमच्या लेकरांना तेथे पाठवून नका. तुमच्या लेकरांना पाठवा. पण तुमची लेकरे तर विदेशात राहतात, विदेशात कामकाज करतात. तेंव्हा आमच्या गरीब आणि बेरोजगार लेकरांना औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याच्या आरोपात तुरूंगात पाठवू नका. आजच्या परिस्थितीत औरंगजेबाच्या नावाचे राजकारण देशाच्या हिताचे नक्कीच नाही. त्यामुळे देशात अस्थिरताच तयार होईल. भारताच्या समृध्दतेला धोका आणण्यासाठी का हा बनाव तयार केला जात आहे असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. पोलीस आणि तत्सम यंत्रणा आपले मुळ काम विसरून जवळपास सेवाच करत आहेत.
संजय राऊत हे नेते जवळपास दररोजच प्रे्रस कॉनफ्रंस घेतात आणि बीजेपी बद्दल बोलत असतात. अगोदर अत्यंत घाणेरडे बोलणारे देवेंद्र फडणवीस सुध्दा आता शांत झाले आहेत. कारण ते पहिले म्हणायचे संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्या डोक्याचा इलाज करायला हवा आणि इलाजासाठी लागतील ते पैसे आम्ही देवू. पण आज ते काही बोलत नाहीत. औरंगजेबचा मुद्या पुढे घेवून बीजेपी पुढे जात होती पण बहुदा आता त्यांना आता हे कळले आहे की, औरंगजेब हा विषय सध्या प्रासंगीक नाही. आम आदमी पार्टीचे खा.संजय सिंह यांनी सांगितले की, जग अंतरिक्षातील वेगवेगळ्या ग्रहांवर कसे पोहचले जावे याचा विचार करत असतांना भारतात मात्र 300 वर्षापुर्वी गाडलेल्या, ज्या हाडांची माती झाली असेल त्यांना उकडण्यासाठी चर्चा करत आहेत. हीच आहे काय आपल्या भारताची प्रगल्भ लोकशाही याचे उत्तर आम्ही वाचकांवर सोडतो. अजित पवार गटाचे आ. अमोल पिचकरी यांनी सुध्दा सांगितले की, औरंगजेबाचा मुद्दा आता सोडणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस सुध्दा आता आपल्या नेत्यांना सांगत आहेत की, औरंगजेबचा मुद्दा सोडून द्या.खरे तर लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांचे कर्ज, शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा, महाराष्ट्रावर असलेले 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज यावर चर्चा घडायला हवी. पण दुर्देवाने औरंजेबच्या कबरीवर चर्चा होत आहे.
नई लाशे बिछाने के लिए गडे मुडदे उखाडे जा रहे है।
