नांदेड(प्रतिनिधी)-अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार गाड्या पकडून मरखले पोलीसांनी 6 लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व सहा जण कर्नाटक राज्यातील आहेत. अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्या आणि वाळू असा एकूण 14 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
देगलूरचे पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात मरखेलचे पोलीस निरिक्षक रवि हुंडेकर, पोलीस अंमलदार नारायण यंगाळे, चंद्रकांत पांढरे, रविंद्र घुले आदींनी 17 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या कालखंडात वझर ते शिळवणी जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वाळू भरून जाणारे ट्रॅक्टर के.ए.38 ए.6340, के.ए.38 टी.6904, के.ए.38 ए.6954, आणि एक विना नंबरचे ट्रॅक्टर अशा चार गाड्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये वाळू भरलेली होती. त्या वाळूचे कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते. तसेच महसुल कायद्याप्रमाणे सुर्यास्त ते सुर्योदय या कालखंडात वाळू वाहतुक करताच ये नाही. ट्रक्टरमध्ये भरलेली वाळू 24 हजार रुपयांची आणि ट्रक्टर 14 लाखांचे असा 14 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि माधवराव हुंडेकर आणि पोलीस अंमलदार नारायण पांडूरंग येंगाळे यांच्या तक्रारीवरुन चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यामध्ये वसंत तुकाराम कासले रा.रामनगर ता.औराद जि.बिदर, सिमन उमाकांत सुर्यवंशी (26) रा.मुगनाळ ता.औराद जि.बिदर, ईस्माईल कुरेशी रा.औराद जि.बिदर, सुभाष शंकर कासले रा.औराद जि.बिदर आणि चंद्रकांत शंकर पवार (45) रा. कमलनगर ता.औराद जि.बिदर या सहा जणांची नावे आरोपी सदरात आहेत.
मरखेल पोलीसांनी अवैध वाळूचे 4 ट्रॅक्टर पकडले ; त्यात कर्नाटक राज्यातील सहा आरोपी
