नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्वाची बदली नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची आहे. यात महत्वाचा भाग असा आहे की, मिनल करणवाल यांच्या जागी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांना जिल्हा परिषदेचे पद अवनत करून त्यांन नियुक्ती दिली आहे.
राज्य शासनाने राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये 2014 बॅचच्या आंचल गोयल या नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. त्यांना जिल्हाधिकारी मुंबई शहर या पदावर नियुक्ती दिली आहे. सन 2019 च्या बॅचचे अधिकारी अनिकेत जे जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांना जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पाठविण्यात आले आहेत. नांदेड येथील सन 2019 बॅचचे अधिकारी मिनल करणवाल यांना नांदेड पेक्षा मोठा जिल्हा जळगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पाठविले आहे. सन 2021 बॅचच्या मेघना कावली सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक आदिवासी विभाग किनवट यांना जिल्हा परिषदेतील पद अवनत करून त्यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
सन 2021 बॅचच्या अधिकारी करिश्मा नायर या सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार तथा प्रकल्प संचालक आदिवासी विकास विभाग जिल्हा पालघर यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नाशिक या पदावर नियुक्ती दिली आहे. कुरखेडा उपविभाग जिल्हा गडचिरोली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक आदिवासी विकास विभाग यांना सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली उपविभाग येथे नियुक्ती दिली आहे.
राज्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नांदेड जिल्हा परिषदे मेघना कावली; मिनल करणवाल जळगाव जिल्हा परिषदेत
