नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भीषण अपघातात दोन ठार; सहा जखमी

                                          मयत 

अर्धापूर(प्रतिनिधी)-नांदेड -अर्धापूर रस्त्यावरील पिंपळगाव फाट्याजवळ स्कारपीओ गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  स्कारपीओ गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने दोन ठार, सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आज दि.15 मार्च रोजी सायंकाळी नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील महादेव पिंपळगाव फाट्याजवळ अर्धापूरकडून येणाऱ्या एम.एच.26 ए.ए.7111 या स्कारपीओ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती स्कारपीओ गाडी रस्त्याच्या मधोमध अससलेल्या डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 09  जी जे 0147 वर जाऊन आदळी. यामध्ये सात युवक प्रवास करू लागले होते. त्यातील दोन युवक मरण पावलेल्याचे समजते तर सहा जण जखमी आहेत. मरण पावणाऱ्या युवकांमध्ये शेख सलाम शेख गौस (30) रा.पाकिजानगर देगलूरनाका, सय्यद हुसेन (32) रा.पाकिजानगर देगलूरनाका यांचा समावेश असल्याचे कळते तर जखमी युवकांमध्ये शेख रिजवान अलीम (25) रा.पाकिजानगर देगलूरनाका,नौमान खान हबीब खान (18) रा.पाकिजानगर देगलूरनाका, सय्यद फजल सय्यद गौस (27) रा.पाकिजानगर देगलूरनाका, शेख रिजवान अलिम(25) रा.पाकिजानगर देगलूरनाका, शेख मस्तान शेख जैनोद्दीन (30) रा.शाहिननगर देगलूरनाका, शंकर बोडके रा. पिंपळगाव ता. अर्धापूर जि. नांदेड यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित घटनेचा सीसीटीव्ही 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!