नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरी केलेला सोन्याचा ऐवज किंमत 4 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार संदीप घोगरे, विलास कदम, बालाजी कदम, गणेश धुमाळ, तिरुपती तेलंग, अमोल घेवारे, राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांना हरीओमनगर नांदेड येथे पाठविले. आपल्या साहेबांच्या माहितीला प्रत्यक्षात आणत इतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तेथे त्यांनी कपिल नवनाथ देशमुख(41) रा.कांडली ता.कळमनुरी ह.मु.चैतन्यनगर नांदेड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन सोन्याच्या साखळ्या, पाच अंगठ्या असा एकूण 4 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा ऐवज भाग्यनगर येथील गुन्हा क्रमांक 15/2025 मध्ये चोरीला गेलेला ऐवज आहे. स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या या कार्यवाहीचे कौतुक करणे आवश्यक आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,282 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भीषण अपघातात दोन ठार; सहा जखमी स्टारलिंकला भारताचे संपूर्ण इंटरनेट दिले गेले ; राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्याचे काय?