नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर तामसा येथे एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण दोन चोरट्यांनी जबरदस्ती तोडून नेले आहे. तसेच नावेगाव ता.धर्माबाद येथे एक घरफोडून चोरट्यांनी 66 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
मिरा उल्हास बंडेवार (60) या महिला 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ऍटोतून प्रवास करून आल्या आणि घराजवळ उतरून घराकडे पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण 1 लाख रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले. तामसा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 41/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक खेडकर अधिक तपास करीत आहेत.
साळूबाई सिध्दप्पा वाड रा.नावेगाव ता.धर्माबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मार्चच्या रात्री 9.30 ते 9 मार्चच्या मध्यरात्रीनंतर 1.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरातील दरवाज्याचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम 20 हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिणे 46 हजार 200 रुपयांचे असा एकूण 66 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 60/2025 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस अंमलदार संगेवार अधिक तपास करीत आहेत.
तामसात 60 वर्षीय महिलेचे गंठण तोडले ; नावेगाव ता.धर्माबाद येथे घर फोडले
