पोलीस विभागाची निर्भाया रॅली लक्षवेधक

नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयटीआय चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने पोलीस विभागातील महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांनी निर्भया रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार, डॉ.गर्वितासिंह आणि संस्कृती गुरव यांची उपस्थिती होती.
8 मार्च हा महिला दिन आणि महिलांनी अत्यंत भयमुक्त वातावरणात संचार करावा यासाठी रात्री 8 ते 10 या वेळेत आयटीआय चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांनी मशाल घेवून निभर्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत शाळा आणि महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थीनी, युवती, महिला संघटना यांनी मोठ्या संख्येत सहभागी नोंदवला. या निर्भया रॅली मुलींनी संरक्षणाचे अनेक चितथरारक प्रात्यक्षीक करून दाखवले. महिलांनी पोवाडे सादर केले. पोलीस दलात आपल्या कर्तव्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदारांचे या कार्यक्रमात कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार, डॉ.गर्वितासिंह, संस्कृतीक गुरव आदींनी आपल्या शब्दात महिलांच्या आजच्या परिस्थितीत बद्दल विवेचन केले. महिलांनी आत्मसन्मान बाळगण्यासाठी शिकून आपल्या पायावर उभे राहणे का आवश्यक आहे. या संदर्भाने सांगितले. पोलीस उपअधिक्षक डॅ.अश्र्विनी जगताप यांनी आपल्या घरातील ज्योतिबांमुळे आम्ही सर्व सावित्री रस्त्यावर असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात महिला पोलीस निरिक्षक अरुणा सुगावे, पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे, माया भोसले, जयश्री गिरे, अश्र्विनी गायकवाड, नमिता देशमुख यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!