नांदेड :- शनिवार 22 मार्च 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन , ई-चालन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 22 मार्च 2025 रोजी लोकअदालत आयोजित केली आहे.
तरी या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या या लोकअदालतीमध्ये वाहनचालक, मालक यांनी हजर राहावे. तसेच तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा व सर्वानी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
