नांदेड(प्रतिनिधी)-ग्यानमाता विद्याविहार या शाळेत दहा वर्षीय बालकासोबत शारिरीक अत्याचार करणाऱ्या तेथील सेवकाला पोक्सो न्यायालयाने 11 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
भारताचे भविष्य घडविण्यात गर्क असणाऱ्या एका कुटूंबातील 10 वर्षीय बालक त्याचे भविष्य घडविण्यासाठी कुटूंबानी तो बालक ग्यानमाता विद्याविहार या शाळेत शिकायला पाठविला. 6 मार्च रोजी अचानक घडलेल्या घटनेने हल्लखोळ झाला. तेंव्हा त्या बालकाची आई तेथे पोहचली. सुदैवाने त्या शाळेत सर्वत्र सीसीटीव्ही आहेत आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये साबसिंग मुन्नालाल मचल (51) याने त्या बालकासोबत अभद्र व्यवहार केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केले. बालकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर विमानतळ पोलीसांनी पोक्सो कायद्याच्या कलम 8, 10 आणि 12 तसेच बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 75 नुसार गुन्हा क्रमांक 77/2025 दाखल केला. पोलीसांनी 6 फेबु्रवारी रोजीच रात्री साबसिंग मुन्नालाल मचलला अटक केली होती.
आज सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी साबसिंग मचलला न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी करतांना सांगितले की, या साबसिंगने इतर विद्यार्थ्यांसोबत असे काही वर्तन केले आहे काय? याचा शोध घेणे आहे. तसेच त्याला कोणी मदत केली आहे का याचा शोध घेणे आहे. यासाठी पोलीस कोठडीत मिळावी. युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी साबसिंग मचलला 11 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
ग्यानमाता विद्याविहार मधील दुर्व्यहार; आरोपी 4 दिवस पोलीस कोठडीत
