नांदेड(प्रतिनिधी)-परिवहन विभागातील महिला मोटार वाहन निरिक्षकाला एका खाजगी वाहन चालकाने धमक्या दिल्या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात असज्ञेय अपराधाची नोंद करण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागातील महिला मोटार वाहन निरिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्या फेबु्रवारी 2025 पासून परिवहन विभागाच्या भरारी पथकात कार्यरत आहेत. त्या आपल्या कर्तव्याप्रमाणे काम करत असतांना श्रावण जाधव याने ते काम न करण्यास मला प्रतिबंध केला. दि.26 फेबु्रवारी रोजी वाहन क्रमांक एम.एच.26 सी.ई.0300 या वाहनाने माझ्या शासकीय वाहनाचा पाठलाग केला. 27 फेबु्रवारी रोजी मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास बिना नोंदणी क्रमांकाच्या एका चार चाकी वाहनाने माझ्या घराची रेखी केली. सोबत श्रावण जाधव वाहतुक बाईला दाखवतो. बाईच्या अंगावर बाई सोडतो किंवा लाच लुचपत विभागाचा खोटा ट्रॅप लावतो असे बोलत आहे. परभणी कार्यालयातील एक मोटार वाहन निरिक्षक माझे न ऐकता ओव्हरलोड गाढ्यांवर का र्यवाही करत होता. त्याची गाडी कशी जळाली या वाहतूक बाईला माहित नाही असे बोलत आहे. श्रावण जाधवचे अवैध गुन्हेगारी संघटनासोबत संबंध असल्याची शक्यता महिला मोटार निरिक्षकांना वाटते. शासकीय कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणे आणि धमकावणे या पध्दतीने आपले उद्देश साध्य करण्याचे काम श्रावण जाधव करतो.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 221 आणि 224 प्रमाणे असंज्ञेय अपराध क्रमांक 177/2025 दि.5 मार्च 2025 रोजी दाखल केला आहे. प्रादेशिक परिवहन विभागात असे भरपूर काम चालतात. काही चांगले, काही वाईट सर्वच प्रकारची मंडळी त्या विभागात आपले ईप्सीत साध्य करण्यासाठी धावपळ करतात हा प्रकार काही नवीन नाही.
महिला मोटार वाहन निरिक्षकाला खाजगी माणसाने दिली धमकी
