नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील महाविर चौक ते कलामंदिर या भागात अतिक्रमण करून छोटे-छोटे व्यवसाय चालविणाऱ्या छोट्या व्यवसायीकांचे सामन काढून टाकण्यात आले
. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक यांनी केली.
शहरात वाहतुक समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ती समस्या दुर करण्यासाठी 3 मार्च रोजी महाविर चौक, सोनु कॉर्नर, वजिराबाद चौक, आयुर्वेदीक कॉलेज, कलामंदिरपर्यंत पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्यासमक्ष महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने तसेच वजिराबाद येथील वाहतुक शाखेने या भागात असलेले फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, किरकोळ कटलरी सामन विक्रेत यांचे हातगाडे आणि फुटपातवर ठेवलेले साहित्य काढून टाकण्यात आले आहे.

यापुढे महाविर चौक, सोनु कॉर्नर, वजिराबाद चौक, आयुर्वेदीक कॉलेज या परिसरात फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, कटलरी सामान विक्रेते यांचे हातगाडे आणि फुटपाथवर ठेवलेले साहित्य ठेवू नये म्हणून त्यांना पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने सक्त सुचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत या भागात असलेले सायकल ट्रक काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच पुढे सुध्दा या किरकोळ साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले किंवा फुटपाथवर सामन ठेवले तर त्यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयााने प्रसिध्दीसाठी पाठविली आहे.

