नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी एका कारमध्ये अवैधरित्या जाणारा 3 लाख 25 हजार रुपयांचा गुटखा आणि सोबत कार, मोबाईल असा एकूण 6 लाख 34 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार माधव मारोती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.1 मार्च 2025 रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास चुंगीनाका कुंडलवाडी आणि बिलोली शहरातील अब्दुल फेरोज अब्दुल वाहब रा.इमानदारगल्ली बिलोली येथे ही कार्यवाही करण्यात आली. सर्वप्रथम एक चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.05 ए.जे.8096 पकडण्यात आली. हे वाहन बिलोलीकडून कुंडलवाडीकडे आले होते आणि त्या चौकशीत त्या चार चाकी गाडीमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला विविध कंपन्यांचा गुटखा होता. यासोबत कार आणि मोबाईल असा एकूण 6 लाख 34 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी या प्रकरणी शेख वाजेद शेख मंजुर अहेमद (36) रा.गुंठागल्ली धर्माबाद आणि अब्दुल फेरोज अब्दुल वाहब रा.इमानदारगल्ली बिलोली या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर शिंदे, पोलीस अंमलदार माधव पाटील, रामेश्र्वर पाटील, रघुविरसिंह चौहाण, गृहरक्षक दलाचे जवान अरुण इरेवार, ईस्माईल पठाण, महेश आदमनकर, आकाश गायकवाड, ज्ञानेश्र्वर रामपुरे, शेख गौस, लिंगुराम गुरुपवाड आणि सुप्रिया बोलचेटवार यांनी ही कार्यवाही केली.