नांदेड(प्रतिनिधी)-नागरी पतसंस्था शाखा भावसार चौक येथे सोने गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाच्यानंतर त्या सोन्यामध्ये 313.92 ग्रॅम सोन्याचे दागिणे कमी सापडले. याची एकूण किंमती 24 लाख 79 हजार 968 रुपये आहे.
समता पतसंस्था खंदक नाका कोपरगाव जि.अहिल्यानगर येथील वैभव जयराम धरम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 जुलै 2025 रोजी 11 वाजता ते 9 नोव्हेंबर 2025 च्या सकाळी 10.30 वाजेदरम्यान नागरी पतसंस्था शाखा भावसार चौक येथे पतसंस्थेमध्ये ग्राहकांनी सोने तारण ठेवून कर्ज काढले होते. त्या सोन्याच्या एकूण 600 पिशव्या पतसंस्थेच्या लॉकरमध्ये होत्या. त्यापैकी पतसंस्थेच्या लॉकरमध्ये 159 सोन्याच्या पिशव्या व गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. सो.लि. येथील लॉकरमध्ये 433 सोन्याच्या पिशव्या आढळून आल्या. या सर्व पिशव्यांपैकी 8 सोन्याच्या पिशव्यांमधील 313.92 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 24 लाख 79 हजार 968 रुपये किंमतीचा ऐवज सापडला नाही. त्या पिशव्यांमधील गडबड माधव आनंराव शिवशेट्टे रा.रोशनगाव ता.धर्माबाद जि. नांदेड यांनी पतसंस्थेसोबत विश्र्वासघात करून फसवणूक केली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 316(5), 316(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 125/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नाईक हे करीत आहेत.
पोलीसांनी स्वत: प्रेसनोटमध्ये पाठविलेल्या या माहितीत गुन्हा घडल्याचा दिनांक 15/07/2025 ते 19/11/2025 असा लिहिला आहे. 2025 चा फेबु्रवारी महिना सुरू आहे आणि गुन्हा 2025 च्या जुलै ते नोव्हेंबरमध्ये घडतो आहे असे लिहिले आहे. त्यानंतर गुन्ह्याचा क्रमांक लिहितांना त्यावरील वर्ष 2024 लिहिले आहे. काय समजावे या सर्व गणिताला असे सांगितले जाते की, प्रेसनोट तयार झाल्यावर याची तपासणी सुध्दा होते. पोलीस दलातील कामकाजाच्या पध्दतीप्रमाणे कनिष्ठ पोलीसांकडून झालेल्या चुका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुरूस्त करायच्या असतात. पण आज असे लिहुन पाठविण्यात आले आहे हे त्यांचे त्यांनाच माहित.
पतसंस्थेत ठेवलेल्या सोन्यांच्या पिशव्यांमध्ये 313.92 ग्रॅम सोन्याचा झोळ
