तिन जणांनी दारुच्या बाटल्या आणि बिअर बाटल्या बळजबरीने चोरून नेल्या

नांदेड(प्रतिनिधी)-सांगवीच्या एका बिअरबारमधून इंग्लीश दारु आणि बिअर बाटल्या असा 49 हजार 395 रुपयांचा ऐवज तीन दरोडेखोरांनी बळजबरीने चोरून नेला आहे.
राजेंद्र शेषराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते गोल्डन ब्रिस्टल बार ऍन्ड रेस्टॉरंट सांगवी (बु) येथे नोकरी करतात. 26 फेबु्रवारीच्या रात्री 8 वाजता निखील नाईक रा.सिध्दार्थनगर सांगवी (बु), लखन वाघमारे आणि इतर एक ज्याचे नाव माहित नाही असे तिघे जण आले आणि वाद घातला. या वादातून त्यांनी बारच्या रॅकमध्ये असलेल्या देशी दारुच्या बाटल्या व बिअर बाटल्या असा एकूण 49 हजार 395 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी तिघांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) प्रमाणे गुन्हा क्रमांक 69/25 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साने यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!