नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर शाखेने हरवलेल्या 157 महागडे मोबाईल फोन जप्त करून मालकांना परत दिले आहेत. या मोबाईलची किंमत 24 लाख 81 हजार 500 रुपये आहे.
नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणातून, आठवडी बाजारातू, गर्दीच्या ठिकाणातून गहाळ झालेले मोबाईल बाबत सायबर शाखेचे पोलीस निरिक्षक धीरज चव्हाण यांनी एकूण 157 मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलची किंमत 24 लाख 81 हजार 500 रुपये आहे. आज महाशिवरात्री दिनी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या उपस्थितीत मालकांना परत देण्यात आले. मोबाईलच्या ईएमईआय क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाच्या नांदेड पोलीस या फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर प्रसारीत करण्यात आली आहे. नागरीकांनी आपला ईएमईआय क्रमांक ओळखून सायबर शाखेतून आपला मोबाईल घेवून जावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस विभागाने सीईआयआर या पोर्टलवर आपल्या गहाळ झालेली माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक धिरज चव्हाण,पोलीस उपनिरिक्षक मारोती चव्हाण पेालीस अंमलदार राजेेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, दावीद पिडगे, मोहम्मद आसिफ, किशोर जयस्वाल, काशिनाथ कारखेडे, दिपक शेवाळे, ज्ञानेश्र्वर यन्नावार, दिपक राठोड, कांचन कसबे, शुभांग जाधव यांनी परिश्रम घेवून हे मोबाईल हस्तगत केले आहेत.
सायबर पोलीस ठाण्याने 25 लाखांचे 157 मोबाईल पकडले
