नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस असल्याची बतावणी करून दोन वयस्कर पती-पत्नीकडील 3 लाख 30 हजार रुपयांचे दागिणे काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे.
ओमप्रकाश लक्ष्मणराव भुसेवार (65) हे आपल्या पत्नीसोबत दि.25 फेबु्रवारी रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय महादेव पिंपळगाव येथे लग्न कार्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन अनोळखी लोकांनी मोटारसायकलवर येवून खाली उतरून आम्ही पोलीस आहोत एवढे दागिणे घालून लग्न कार्यालयात जावू नका असे सांगून त्यांच्या दोघांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचे फसवूण घेवून गेले आहेत. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 121/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात सिंघम पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे हे करीत आहेत.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतय्या पोलीसांनी 3 लााख 30 हजारांची फसवणूक केली
