नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी झालेला गोळीबार बब्बर खालसाचा अतिरेवकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदाच्या सांगण्यावरून केल्याची माहिती पंजाब पोलीसांच्या एसएसओसी(स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल) ने दिली आहे. या संदर्भाची बातमी दैनिक अमर उजालाने आपल्या संकेतस्थळावर 24 फेबु्रवारी रोजी रात्री 01.15 वाजता प्रसारीत केली आहे. याचा अर्थ 10 फेबु्रवारी रोजी नांदेडमध्ये गोळीबार करणारा मुख्य आरोपी पकडला गेला आहे. आज पोलीस कोठडी संपलेल्या चार जणांना दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात हजर करून त्याचा चौघांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केल्याने ते चार जण सध्या तुरूंगाच्या वास्तव्यास गेले आहेत.
10 फेबु्रवारी रोजी नांदेडमध्ये गुरूद्वारा गेट क्रमांक 6 समोर गोळीबार झाला.त्यात रविंद्रसिंग दयालसिंग राठोड (30) हा मरण पावला आणि गुरमितसिघ राजासिंघ सेवादार हा जखमी झाला. याबाबत गुरमितसिंघ सेवादारच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुढे दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग झाला. त्यावेळेस पोलीस ठाणे काळा चौकी येथे गुन्हा क्रमांक 2/2025 भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109,61(2), 3(5) आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 आणि 25 सह दाखल झाला. या प्रकरणात वजिराबाद पोलीसांनी सर्वप्रथम मनप्रितसिंघ उर्फ मन्नु गुरबक्षसिंघ ढिल्लो (31) आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅपी बाबुसिंघ कारपेंटर (35) या दोघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने 24 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले होते. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने दलजितसिंघ उर्फ जित्ता करमसिंघ संधू (41) आणि हरजितसिंघ उर्फ राजू अमरजितसिंघ गिल (32) या दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघांना सुध्दा 24 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. या अगोदर नांदेडमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या मामाचा मुलगा अर्शदिपसिंघ भजनसिंघ गिल (25) यास न्यायालयाने 1 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविलेले आहे.
दरम्यान दैनिक अमर उजालाच्या संकेतस्थळावर 24 फेबु्रवारीच्या मध्यरात्रीनंतर 01.15 वाजता प्रसारीत झालेल्या बातमीनुसार टार्गेट क्लिींग करण्यासाठी आलेल्या दोन जणांना पंजाब पोलीसांच्या एसएसओसी विभागाने पकडले. त्यांच्याकडे 12 बोअरची बंदूक आणि 5 जीवंत काडतुसे सापडली. त्यासंदर्भाने एसएसओसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार काद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दैनिक अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार पकडलेल्या दोघांची नावे जगदीशसिंघ उर्फ जग्गा रा.हरीकेपंतग आणि शुभदिपसिंघ उर्फ शुभ औलख रा.तरणतारण जिल्हा अशी आहेत. हे दोघे बीकेआय (बब्बर खालसा इंटरनॅशल) चा अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू आणि युएसएमध्ये राहणारा अतिरेकी हॅप्पी पासिया सोबत यांची जोडणी आहे. ते टार्गेट क्लिींग करतात. या दोघांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 10 फेबु्रवारी रोजी नांदेडमध्ये एका व्यक्तीचा खून केला आहे आणि एक जखमी आहे. हा गोळीबार त्यांनी रिंदाच्या सांगण्यावरून केला आहे.
नांदेडमध्ये झालेला गोळीबार मुळात कैदी क्रमांक 12480 वर करायचा होता. तो व्यक्ती म्हणजे गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार आहे. त्याने सन 2015-16 मध्ये हरविंदरसिंघ उर्फ रिंदाचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्याचा खून केला होता. त्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो 22 जानेवारी रोजी पॅरोल रजेवर आला होता आणि त्यावर रिंदाने पाठविलेल्या जगदिशसिंघ उर्फ जग्गाने गोळीबार केला. पण त्यात रविंद्रसिंघ राठोडचा मृत्यू झाला आणि गुरमितसिंघ सेवादार जखमी झाला. पंजाब पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आता जगदिशसिंघ उर्फ जग्गा पकडला गेला आहे. आता त्याच्यासोबत असलेला नांदेडला आला होता की नाही हा पुढे तपासाचा विषय आहे.
आज पोलीस कोठडी संपलेल्या चार जणांना मात्र दशहतवाद विरोधी पथकाने न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केल्याने न्यायालयाने सध्या त्यांना तुरूंगास वास्तव्यासाठी पाठविले आहे.
10 फेब्रुवारीचा शुटर पंजाब पोलीसांनी पकडला ; गोळीबार रिंदाच्या सांगण्यावरूनच
