नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे तीन घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 68 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड शहरातील दत्तनगर भागात असलेले एक टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी टायर व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
गोपाळ बद्रीनारायण तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 8 ते 23 फेबु्रवारीच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान त्यांचे व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन लोकांचे घरफोडून चोरट्यांनी 3 घर धुवून काढले आहेत. यातील एक कुटूंब पुण्याला गेले होते. या तीन घरांमधून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 68 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हदगाव पोलीसांनी हा चोरीचा प्रकार गुन्हा क्रमांक 43/2025 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक नंद अधिक तपास करीत आहेत.
अनिल अशोक लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दत्तनगर भागात त्यांची साई अलाईनमेंट ऍन्ड टायरची दुकान आहे. 22 फेबु्रवारीच्या रात्री 8.45 ते 23 फेबु्रवारीच्या मध्यरात्रीनंतर 3.30 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाचे छोटे शटर वाकवून कोणी तरी आत प्रवेश केला आणि काऊंटरमधील 5 हजार रुपये रोख रक्कम आणि 13 टायर असा एकूण 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 69/2025 प्रमाणे दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
हदगाव येथे तीन घर फोडून 3 लाख 69 हजारांचा ऐवज लंपास; दत्तनगर येथील दुकानातून टायर चोरले
