◆ शास्त्रीय गायन व वादनाचा कार्यक्रम
◆ संगीत दरबार महोत्सवाचे हे २१ वे वर्ष
नांदेड- देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दि.२५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचे यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. संगीत शंकर दरबार महोत्सवाचे हे २१ वे वर्ष असून या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.
नांदेड नगरीची सांस्कृतिक ओळख असणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या महोत्सवात दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सव पार पडणार आहे.शंकर दरबारचे यंदा २१ वे वर्ष आहे.नांदेड येथील या महोत्सवाची भारतातील मोठ्या संगीत महोत्सवात गणना होते. या महोत्सवामुळेच नांदेड शहराला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री ते केंद्रीय गृहमंत्री असा यशस्वी प्रवास करणारे व मराठवाड्याचे भगीरथ म्हणून ओळखले जाणारे डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे शास्त्रीय संगीतावरील असणारे प्रेम सर्वश्रुत आहे.यामुळेच त्यांनी स्थापन केलेल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीतर्फे कै. डॉ . शंकरराव चव्हाण स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी अभिजात संगीताचा हा ‘संगीत शंकर दरबार’ आयोजित करण्यात येतो.दिग्गज कलाकारांची परंपरा यंदाही कायम आहे.
या दरबारने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असलेल्या अनेक दिग्गज कलाकारांना नांदेडमध्ये आणले आहे. यंदाही ही परंपरा कायम आहे.गौरी पठारे,डॉ. शशांक मक्तेदार,धनंजय जोशी,देवकी पंडीत यांच्या शास्त्रीय गायनाची मेजवाणी यानिमित्ताने नांदेडकरांना अनुभवता येणार आहे. याबरोबरच दरबारच्या पहिल्याच दिवशी अनुराधा नांदेडकर यांच्या साधना सरगम संगीत रजनीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराठी सुगम संगीत मुग्धा वैशंपायन यांचा मुग्धरंग कार्यक्रम होणार आहे. साधना सरगम यांचा ही कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी विघ्नेश जोशी हे निवेदनकर्ते आहेत. प्रसिद्ध सतारवादक पं.बुधादित्य मुखर्जी यांच्यासह सौमेन नंदी,यशवंत वैष्णव यांचे तबला वादन प्रविण गोडखिंडी यांचे बासरी वादना ची मेजवाणी मिळणार आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी.पी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अँड. उदय निंबाळकर यांनी केले आहे.