आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे

*डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार* 

नांदेड :-या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प असून शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय यांना सुखावणारा अर्थसंकल्प केंद्रातील प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने सादर केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

पालकमंत्री एक दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर आले आहेत. महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा समारोप आहे. समारोपीय सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ अजित गोपछेडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या अर्थसंकल्पाचे पालकमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले. बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. त्यामुळे सर्वांसाठी उपयुक्त असा अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट केले.

त्यांनी वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या मनातला अर्थसंकल्प होता अनेक व्यापाऱ्यांनी मला स्वतः फोन करून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पासंदर्भात स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले.

किसान क्रेडिट कार्ड ची व्याप्ती पाच लाखापर्यंत करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले असून नव्या जमान्याच्या आरटीफिसीएल इंटेलिजन्सचा वापर भारताच्या सर्व क्षेत्रातील विकासासाठी करण्याकडे केंद्र शासनाचा कल आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकारणारा हा अर्थसंकल्प असून या देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी अर्थसंकल्पावरील आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी 1 लक्ष 37 हजार 7 56 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकासासाठी एक कोटी 90 लक्ष 405 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी दोन लक्ष 55 हजार 445 कोटींची तरतूद केली आहे यामध्ये सर्वाधिक लाभ हा महाराष्ट्राचा होणार आहे महाराष्ट्रामधील रेल्वे प्रकल्पाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी ,पत्रकारांशी बोलताना त्यांनी नांदेडच्या डीपीसीचा निधी निश्चित वाढून मागू. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नांदेड परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायात गुंतवणूक झाली पाहिजे. या संदर्भात प्रयत्नरत असून या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग समूह यावेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

नांदेड येथे आयुक्तालय आणण्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या अखत्यारितील असून त्याचे त्यांचे त्याबद्दलचे काय मत आहेत हे नक्की जाणून घेऊ असे त्यांनी सांगितले. नांदेडच्या पर्यटनाच्या विकासाबद्दल, गोदावरी नदीच्या स्वच्छता व पर्यटन वृद्धीसाठी पालकमंत्री म्हणून अतिशय जबाबदारीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 *मन की बात कार्यक्रमात सहभाग* 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमांमध्ये आज पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ.अजित गोपछडे व अन्य मान्यवरांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!