*रविवारी राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप*
नांदेड : -राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा समारोप उद्या २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता श्री. गुरु गोविंदसिंह जी क्रीडा संकुलात होणार आहे.
समारोपाच्या या कार्यक्रमाला खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत. तर पालकमंत्री अतुल सावे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार होते. परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. इतर मागास बहुजन कल्याण, पशुसंवर्धन व अपारंपारिक ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे देखील उद्घाटनाच्या सोहळ्याला येऊ शकले नव्हते. दोन्ही मंत्र्यांनी आपला दौरा निश्चित केला आहे. महसूल मंत्री नागपूर वरून उद्या नांदेडमध्ये पोहोचणार आहेत.
जवळपास दोन हजारावर खेळाडू सध्या या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. अनेक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दरम्यानच्या काळात या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहे. नांदेडसाठी हे फार मोठे आयोजन असून उद्या या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप होत आहे. त्यामुळे खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी महसूल मंत्री आणि पालकमंत्री दोघेही उद्या समारोपाच्या कार्यक्रमाला पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
उद्या सायंकाळी चार वाजता गुरुगोविंद सिंह जी क्रीडा संकुलात हा समारोप सोहळा होणार आहे.