नांदेड(प्रतिनिधी)-साखरपुड्याच्या कार्यक्रमात देण्यासाठी आणलेल्या किंमती ऐवज चोरट्यांनी श्री गुरू ग्रंथ साहिबजी भवन येथून चोरून नेला आहे.
दर्शनसिंघ चंदासिंघ सिधू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी 2025 ते 15 फेबु्रवारी 2025 दरम्यान त्यांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम श्री गुरू गोविंदसिंघजी भवन येथे होता. तेथेच ते एक दिवस निवासासाठी होते. त्या कार्यक्रमात मुलीला देण्यासाठी आणलेला सोन्याचा हार 1 लाख 51 हजार 818 रुपयांचा, एक घड्याळ 3 हजार रुपयांचे आणि रोख रक्कम 10 हजार असा एकूण 1 लाख 64 हजार 818 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 73/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.
साखरपुड्याच्या कार्यक्रमात 1 लाख 65 हजारांची चोरी
