नांदेड(प्रतिनिधी)-राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2025 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा जिल्ह्यातील 172 परिक्षा केंद्रावर घेतली जात असून यासाठी 23 हजार 456 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज केला. यात 22 हजार 878 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी उपस्थितीत दर्शवली.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा दि.21 रोज शुक्रवारपासून सकाळी 11 ते 2 यावेळात सुरू झाली असून पहिल्याच दिवशी मराठी या विषयाच्या पेपरला एकूण 23 हजार 456 विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 878विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. तर 578 विद्यार्थ्यांची या परिक्षेस गैरहजेरी होती. उच्च माध्यमिक इयत्ता 12 वीच्या परिक्षेनंतर इयत्ता 10 वीच्या परिक्षेला सुरूवात झाली असून राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची मोहिम राबवली जात आहे. तशी नांदेडमध्येही जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपी मुक्त अभियान राबवल गेल. यात अनेक कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांवरही कार्यवाही करण्यात आली. याचाच परिणाम आज पहिल्या दिवशी पार पडलेल्या दहावीच्या परिक्षेत मात्र कोणत्याही परिक्षा केंद्रावर कॉपीची कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले आहे.
शालांत परिक्षेस 172 परिक्षा केंद्रावर सुरूवात
