नांदेड(प्रतिनिधी)-आपली बदली झाल्यानंतर सुध्दा दीड वर्ष येथेच मुक्कामी असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांनी मागील आठ-दहा दिवसांपासून आजारी रजेवर आहेत आणि आजारी रजेवर असतांना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नेत्यांसोबत आपल्या पापांचे क्षालन करण्यासाठी प्रयागराज वारी केल्याची खात्रीलायक माहिती आहे. कोणाच्या आशिर्वादाने टिकले पवार साहेब याचा शोध आता हळूहळू लावायला पाहिजे.
नांदेड जिल्ह्यात पोलीस उपनिरिक्षक म्हणून पहिल्यांदा आलेले चंद्रकांत पवार पुढे सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती मिळवून पुन्हा नांदेडला आले. शहरातील वसंतनगरच्या आशिर्वादाने त्यांनी पहिल्यांदा पोलीस ठाणे लिंबगाव मिळवले. त्यानंतर त्यांची बदली नागपूर शहर येथे झाली. पण ते गेले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्दा त्यांना न सोडण्यामध्ये रस दाखवला. याचे कारण काय असेल? पुढे त्यांना उस्माननगर हे पोलीस ठाणे सुध्दा वसंतनगरच्या आशिर्वादानेच मिळाले असे जग सांगते. त्यांच्यासोबत बदली झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले होते. परंतू चंद्रकांत पवार यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही ते नांदेडमध्येच सेवा करत होते. पुढे निवडणुक जाहीर झाली आणि निवडणुकीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सुध्दा त्यांना येथे राहता येणार नाही अशी परिस्थिती आली. पण कोणी तरी हुशार व्यक्तीने त्यांची बदली ही निवडणुकीच्या पुर्वी सर्वसाधारण बदल्यामध्ये झाली असल्याने निवडणुक काळातील मार्गदर्शक सुचना त्यांना लागू पडत नाहीत अशी सोय काढली. त्यामुळे सुध्दा त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर शहर या बदलीवर सोडले नाही.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठ -दहा दिवसांपुर्वी सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आजारी रजेवर गेले आहेत. आजारी रजेवर असतांना त्यांनी नांदेड येथील वसंतनगर येथील नेते व इतर नेत्यांसोबत प्रयागराज वारी केली आहे. प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर आलेला महाकुंभाचा पर्व सर्व पापांचे क्षालन करणार आहे अशी या कुंभांची जाहीरात उत्तर प्रदेश सरकारने केली होती. परंतू शंकराचार्य श्री अभिमुक्तेश्र्वरानंदजी यांनी मी 2001, 2013 या वर्षात सुध्दा ही 144 वर्षाची ख्याती ऐकली होती असे सांगतांना 144 वर्षांची परंपरा कोणत्याही हिंदु धर्म शास्त्रांमध्ये नमुद नसल्याचे सांगितले. तरीपण अनेक जणांनी या 144 वर्षाच्या जाहीरातीच्या भुलीत प्रयागराजव वार केली त्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांचा सुध्दा समावेश आहे.
प्रयागराज वारी संपल्यावर सुध्दा चंद्रकांत पवार परत आपल्या कर्तव्यावर हजर झालेले नाहीत. असाच बदली झाल्यानंतर आहे तेथेच टिकण्याचा प्रकार परभणीचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी चालविला होता. त्यांनी तर पोलीस महासंचालक कार्यालयातून फोन आला याच आधारावर आपल्या बदली झालेल्या ठिकाणावर गेले नाहीत. खरे तर त्यांची भविष्याचे पोलीस घडविण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रात झाली होती. सध्या त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे ते निलंबित आहेत आणि त्याबद्दलची चौकशी न्यायालयीन समिती करणार आहे.
आजारी रजा घेवून प्रयागराज वारी संपल्यानंतर सुध्दा परत न आलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे मुंबई मुक्कामी आहे अशी चर्चा सुरू आहे. कारण त्यांच्या बदलीला स्थगिती मिळेल किंवा ती बदली रद्द होवून पुन्हा नांदेड जिल्ह्यात नियुक्ती दिली जाईल म्हणूनच प्रयागराज वारी कामाला येईल अशी चर्चा आहे. चंद्रकांत पवार भरपूर वजनदार व्यक्तीमत्व आहेत आणि त्यांनी बदली रद्द करून आणली तर त्यात चुकीचे काय असेल. कारण त्यांच्यावर वसंतनगरची छत्र छाया आहे.
उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आजारी रजेवर असतांना प्रयागराज वारीपुर्ण करून काय मागितले असेल?
