अमेरिकेतून अवैध भारतीय प्रवाशांचे विमान परत यायला सुरूवात झाली आहे. त्यातील पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी आले, दुसरे विमान 15 फेब्रुवारी रोजी भारतात उतरले, तिसरे विमान 17 फेब्रुवारी रोजी येणार आहे. हे सर्व विमान पंजाबच्या अमृतसरमध्ये का उतरले जात आहेत, गुजरातमध्ये का नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सांगतात की, पंजाब आणि पंजाबी यांची बदनामी करण्याच्या हेतुनेच ही विमान पंजाबमध्ये उतरविले जात आहेत. यासंदर्भाचा मागोवा घेतला असता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातमधील मुळ जिल्हा मेहसाणा येथील सर्वाधिक अवैध प्रवासी अमेरिकेत आहेत आणि त्यामुळेच बहुदा हा खेळ केला जात आहे. इतर राज्यातील जे अवैध प्रवासी परत आले आहेत, त्यांच्यासोबत प्रसार माध्यमे बोलत आहेत, पण गुजरातमधील परत आलेल्या प्रवाशांना प्रसारमाध्यमांसोबत बोलू दिले जात नाही. या प्रकाराला काय म्हणावे. अशी समृद्ध लोकशाही भारतात जिवंत आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या जगातील अवैध प्रवाशांना मी परत पाठवणार आहे, याची घोषणा केली होती. 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच 5 फेब्रुवारी रोजी पहिले विमान परत आले. त्यात एकूण 102 प्रवासी होते. त्यात सर्वाधिक गुजरातचे 33 होते, त्यातही 7 कुटुंबातील 21 जण आहेत.सर्वाधिक छोटा प्रवासी 4 वर्षांचा होता, तो सुद्धा गुजरातचा आहे. त्यावेळेस अवैध प्रवाशांना हातकड्या आणि पायात बेड्या टाकून पाठविले होते. पुढे 12 ते 14 फेबु्रवारी हे दोन दिवस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत होते. अमेरिकेत असताना त्यांनी 5 फेब्रुवारी रोजी परत आलेल्या भारतीयांना टाकण्यात आलेल्या हातकड्या -बेड्या याचा विरोध दर्शविला काय? दर्शविला नसेल तर ठिकच झाले. पण विरोध दर्शविला असेल आणि यानंतर आलेल्या 15 फेब्रुवारीच्या अमेरिकन सैन्य विमानात असेच हातकड्या आणि बेड्या घातलेले प्रवाशी आहेत, तर अमेरिकेने भारताची केलेली ही बेअब्रू अत्यंत भयानक आहे.
परत आलेल्या पहिल्या विमानात काही अवैध भारतीय प्रवाशांना प्रसारमाध्यमे बोलली आहेत, त्यांच्या समक्ष त्यांनी आपले हाल सांगितले आहेत. पण गुजरामध्ये पोहचलेल्या अवैध प्रवाशांना मात्र प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे चुप्पी साधण्याचे आदेश गुजरात पोलिसांनी दिले आहेत, का दिले असतील हे आदेश. गुजरामध्ये परत आलेल्या 33 अवैध प्रवाशांमध्ये सात परिवाराचे एकूण 21 जण आहेत आणि उत्तर गुजरातमधील सर्व मिळून 28 जण आहेत. उत्तर गुजरातमध्ये बनासकाठा, गांधीनगर, सावरकाठा, मेहसाणा आणि राजस्थानच्या सिमेवर असलेले गुजरात म्हणजे उत्तर गुजरात आहे. गुजरामध्ये मेहसाणा जिल्हा हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुळ जिल्हा आहे. याच भागातील सर्वाधिक लोक अमेरिकेत डंकी मार्गाने गेलेले आहेत. त्यातील सर्वाधिक लोक ग्रामीण भागातील आहेत, काही पत्रकार मेहसाणा जिल्ह्यात परत आलेल्या अवैध प्रवाशांचे पत्ते घेवून पोहचले. पण त्या भागामध्ये स्मशान शांतता पसरली आहे. परत आलेल्या प्रवाशांचे नातलग भेटले, शेजारी भेटले परंतु प्रवाशी मात्र भेटले नाही. पत्रकारांना सांगण्यात आले की, आम्ही पत्रकारांशी नाहीच नाही पण कोणासोबत सुद्धा बोलू नये, असे बंधन गुजरात पोलिसांनी आमच्यावर टाकले आहे. यासंदर्भाने काही पत्रकार पोलीस अधीक्षक मेहसाणा आणि पोलीस अधीक्षक गांधीनगर यांना बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण दोन्ही पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांना नकारच दिला. आता पत्रकार मंडळी पोलीस महासंचालक गुजरात यांच्यासोबत बोलून परत आलेल्या अवैध प्रवाशांना भेटण्याची तयारी करीत आहेत.
तीन ते साडे तीन वर्षांपूर्वी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी व्यासपीठावर भाषणात सांगितले होते की, गुजरातमध्ये आम्ही आमच्या नागरिकांना योग्य रोजगार देऊ शकत नाही. त्यांना चांगले उत्पन्न होत नाही. म्हणूनच आमच्या भागातील अनेक नागरीक डंकी रस्त्याने अमेरिकेत जात आहेत. यासाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. त्यावेळी घडलेली एक अशी घटना होती की, पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले कॅनडामध्ये थंडीने मरण पावली होती. ती सुद्धा डंकी मार्गाने अमेरिकेला जात होती. उत्तर गुजरातमध्ये दरवर्षी 5 हजार लोक या डंकी रस्त्याने अमेरिकेत जाण्यासाठी आपले घर-दार, दाग-दागिने, संपत्ती विकून दलालांना 80 लाख ते 1 कोटी रूपये देतात आणि ऐवढे पैसे देऊन सुद्धा त्यांना त्या जीवघेण्या रस्त्याने अमेरिकेत जावे लागते. म्हणूनच अमेरिकेतून परत आलेल्या अवैध प्रवाशांना मेहसाणा जिल्ह्यात पत्रकारांना बोलू दिले जात नाही. ते बोलले तर उत्तर गुजरातमध्ये बेकायदेशीर, खोटे, पारपत्र (पासपोर्ट), प्रवेश पत्र (व्हिसा) मिळविण्याचा दरवर्षीचा अब्जावधीचा बोगस कारभार करणारे रॅकेट उघड होईल आणि हे रॅकेट उघड झाले तर त्यात कोण-कोण गुंतलेले आहे, याचा सुद्धा खुलासा होईल. आमच्या मते राजकीय वरदहस्ताशिवाय असे खोटे रॅकेट चालविणे अशक्यच आहे. मागील दहा वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे, तर मागील 20 वर्षांपेक्षा जास्त गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. दरवर्षी अब्जावधीचा हा खोटा कारभार दशकांपासून सुरू आहे.
अमेरिकेत जवळपास दोन दशकांपासून राहणाऱ्या एका गुजराती परिवाराने सांगितले की, डंकी रस्त्यातून येणाऱ्या भारतीयांना मॅक्सिकन म्हणून तेथे प्रवेश मिळतो. अमेरिकेला अत्यंत आवश्यक असलेली मजुरीमधील सर्वात शेवटच्या स्तराची कामे मॅक्सिकन करण्याचा तयार असतो, त्याचप्रमाणे उत्तर गुजरातमधून येणारे सर्व अवैध भारतीय प्रवाशी सुद्धा अमेरिकेत टिकून राहण्यासाठी काही पण करायला तयार असतात. त्या सर्व कामाची नावे आम्ही लिहू शकत नाही, कारण ते शब्द वापरून आम्ही आमच्या लिखाणात उल्लेखित केले तर भारतीय कायद्यानुसार आमच्यावर खटला भरला जाईल. दोन दिवसांच्या मुक्कामात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान मोदी यांनी बराच वेळ घालविला. त्यात एका बैठकीत त्यांच्यासमोरच नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भरपूर काही शिकलो आहे, त्यात मी पाहिलेला भाव म्हणजे डोनाल्ड ट्रम्प स्वतःपेक्षा आपल्या देशाच्या हिताला जास्त महत्व देतात. मी सुद्धा आता माझ्या भारत देशाच्यापरीने विचार करण्याचा प्रयत्न करीन. पण मोदींनी असा विचार केला असता तर आमच्या परत पाठविलेल्या भारतीयांच्या हातात हातकड्या आणि पायात बेड्या बांधून अमेरिका परत पाठवत आहे, यावर आक्षेप घेतला असता आणि अमेरिकन सैन्याचे विमान भारतात उतरविण्यासाठी बंदी घातली असती. पण असे घडलेले नाही. मॅक्सिको आणि कोलंबिया सारख्या छोट्याशा लॅटीन अमेरिकन देशांनी हिम्मत दाखविली. त्यांनी अमेरिकन सैन्याचे विमान आपल्या जमिनीवर उतरूच दिले नाही आणि आपल्या देशाचे नागरी विमान पाठवून आपल्या लोकांना सन्मानाने परत बोलाविले. नरेंद्र मोदींना आमची विनंती आहे की, तुम्ही भारताच्या 140 कोटी जनतेबद्दल प्रेम दाखवू नका, पण तुम्ही ज्या जिल्ह्यात जन्माला आहात त्या मेहसाणा जिल्ह्यात आणि उत्तर गुजरात भागाच्या नागरिकांसाठी तर प्रेम दाखवा, जेणे करून त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून 40 तासांचा दुर्धर प्रवास करावा लागणार नाही. तुम्ही त्यांना प्रेम दाखविले तरी ते प्रेम आम्ही भारतासाठीच आहे, असे स्वतःची समजूत काढून घेवू. मागील दहा वर्षांपासून अशा अनेक समजूती आहे
अनेक वेळेस आम्ही स्वतःला काढल्या आहेत आणि समाधान मानलेले आहेच.