562 कोटीपैकी 428 कोटी कर्जाची वसुली
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंंकेने बॅंकींग क्षेत्रात डिजिटल क्षेत्रात दमदार पाऊल टाकत एटीएमच्या नंतर आता बॅंकेच्या ग्राहकांसाठी क्युआर कोडची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली.
या पत्रकार परिषदेला बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम यांची उपस्थिती होती.
बॅंकेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून माहे-ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2025 अखेरच्या प्रगतीचा अहवाल सादर करतांना यात बॅंकेच्या भाग भांडवलामध्ये 3.42 कोटींनी वाढ झाली. तर ठेवीमध्ये 75.39 कोटींनी वाढ झाली आहे. 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी 450 कोटीच पिक कर्ज वाटप केल आहे. बॅंकेच्या संचित तोटा 62.45 कोटी होता. आता 29 कोटींवर येवून टेकला आहे. बॅंकेने सर्वात मोठा पल्ला एनपीएमध्ये गाठला आहे. 88 टक्यावरून 16.43 टक्क्यावर येऊन टेकला असून यातही मार्च अखेरपर्यंत 15 टक्यांच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. बॅंकेच्या 60 संस्थेकडून 2.4 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर 25 संस्थेकडे देण्यात आलेले कर्ज 100 टक्के वसुल करण्यात आले आहे. बॅंकेने विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्य आणि केंद्र शासनाकडून 22 कोटी रुपये येणे बाकी आहे. गेल्या अनेक वर्षापासून बॅंकेचा कारभार हा 171 कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. सध्या जिल्ह्यात 63 शाखा सुरू असून तुटपुंज्या कर्मचाऱ्यावर या शाखा सुरू आहेत. नुकतेच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली असून कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लवकरच कर्मचारी भरतीच्या संदर्भात सकारात्मक निर्णय देणार असल्याचे सांगितले. यामुळे आता नव्याने कर्मचारी भरती करण्यासाठी बॅंकेला परवानगी मिळणार असल्याचेही यावेळी अध्यक्षाने सांगितले. गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडे कर्ज थकीत असून या कर्जाच्या वसुलीसाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. या कर्ज वसुलीच्या संदर्भात ही सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत. या कारखान्याला भारत सरकारची संस्था असणाऱ्या आयएफसीआय या संस्थेनेही कर्ज दिले आहे. त्यामुळे त्या संस्थेचे कर्ज व्याजासहीत 46 कोटी रुपये आहेत आणि मध्यवर्ती बॅंकेचे 34 कोटी कारखान्या विक्रीस काढला असता त्याची किंमत 56 कोटी रुपये होत असल्याने या कर्जाच्या संदर्भात आयएफसीआय यांच्याशी चर्चा सुरू असल्याची ही माहिती दिली.एकंदरीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने अल्प कालावधीत मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणून ओळख निर्माण केली आहे.
जिल्हा बॅंकेच्या ग्राहकांसाठी क्युआर कोडची सुविधा- माजी मंत्री खतगावकर
