किनवट,(प्रतिनिधी)- किनवट येथे 14 व्या जागतिक धम्म परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.ज्यात मॅक्स महाराष्ट्र या वृत्त वाहिनीत मराठवाडा ब्यूरो म्हणून कार्य करणारे धनंजय प्रल्हादराव सोळंके यांना पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी,कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, कामगार सोशीत,पीडित,अत्याचारित लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचे प्रश्न सरकार समोर निर्भिडपणे मांडल्याची दखल घेत, त्यांना सन्मान करण्यात आला, त्यांना सन्मान चिन्ह,शाल, पुष्गुच्छ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.किनवट येथे पार पडलेल्या या जागतीक धम्म परिषदेत तेलंगाणाचे विद्रोही कवी गदर यांची कन्या व महाराष्ट्रासह तेलंगणा,आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात धम्म अनुयायी दाखल झाले होते. यावेळी सध्याच्या माध्यमांची दशा आणि दिशा या परिसंवादावर पत्रकार धनंजय सोळंके यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
