नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पतसंस्थेत पैसे जमा करून घेवून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तिन जणांनी सदस्यांची 38 लाख 87 हजार 881 रुपयांना फसवणूक केली आहे.
शेख जाबिद अब्दुल खयुम रा.बाऱ्हाळी ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2024 दरम्यान भारत फायनाशिल शाखा अष्टविनायकनगर,नांदेड यांनी अनेक सदस्यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून रक्कम जमा केली. यात सामील असलेले आरोपी नारायण दिगंबर मुंगल रा.मुगट ता.मुदखेड, संजय चंद्रकांत झुंजारे रा.सिध्देश्र्वर ता.औंढा आणि सिध्दांत प्रशांत चौदंते रा.मुदखेड यांनी एकूण 38 लाख 87 हजार 881 रुपये जमा केले परंतू ते ब्रॅंचमध्ये जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. भाग्यनगर पोलीसांनी या संदर्भाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा क्रमांक 100/2025 आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नाईक हे करीत आहेत.
सदस्यांची 38 लाख 86 हजारांची फसवणूक
