दि.12 ते 14 फेबु्रवारी या दोन दिवसात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत राहणार आहेत. त्या अगोदरच अमेरिकेच्या जमीनीवरून आलेल्या एका सर्व्हेक्षणाचा अहवाल नरेंद्र मोदीसह भारताचे नाक खाली करणारा आला. 1945 नंतर जगात प्रत्येक देशाला गरजेप्रमाणे अर्थ सहाय्य करण्यासाठी अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (आयएमएफ) आणि जागतिक बॅंक(वर्ल्ड बॅंक) या दोन संस्था अस्तित्वात आल्या. या दोन संस्थांचे मुख्यालय अमेरिकेत आहे. मोदीच्या अमेरिका जाण्याअगोदरच जागतिक बॅंकेने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार जगाच्या उत्पादन क्षमतेत भारताचा हिस्सा फक्त 2.8 टक्के आहे आणि एवढ्या आम्ही विश्र्वगुरु झाल्याचा कांगावा गोदी मिडीयाचे पत्रकार करतात आणि हे सर्व मोदींमुळे घडले असे सांगतात. किती पोकळपणा आहे यात हे जागतिक बॅंकेच्या सर्व्हेक्षणामुळे समोर आले. भारताने सुरू केलेल्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅंन्डऍप इंडिया या योजनांचा कसा बट्याबोळ झाला. हे मागील दहा वर्षाचा आढावा घेतला तर समोर येते.
भारताचे पंतप्रधान अमेरिकेत जाण्यासाठी एकच कारण आहे आणि ते म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक त्याशिवाय भारताचे पंतप्रधान अमेरिकेत जात असतील तोच हा 12 ते 14 फेबु्रवारीचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. या दौऱ्यात त्यांना अमेरिकेच्या संसदेत बोलायला मिळेल काय, त्यांच्यासाठी नमस्ते मोदी हा कार्यक्रम होईल काय? कारण त्यांनी डोनॉल्ड ट्रम्पसाठी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे 25 हजार गुजरातील सांभाळून ठेवलेले आहेत. ते मोदी-मोदी करण्यासाठी यावेळेस तयार असतील काय ? कारण अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे हे 25 हजार गुजराती परत कधी भारतात येतील याचा काही नेम नाही.
भारताने मेक इन इंडिया, स्टार्टऍप इंडिया आणि स्टॅंडऍप इंडिया या तिन योजनांची घोषणा 2014 मध्ये केली होती. आज 10 वर्षानंतर सुध्दा इंडिया कोठे आहे हे काही दिसत नाही. मेक इन इंडियाचा असेम्बलिंग इंडिया झाला आहे. स्टार्टऍप इंडिया खऱ्या अर्थाने स्टार्टच झाला नाही आणि स्टॅंडऍप इंडिया स्टॅंडऍप कॉमेडीसारखा दिसतो आहे. जागतिक बॅंकेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जगात 206 देश आहेत. त्यामध्ये सर्वाधिक उत्पादन क्षमता 28.8 टक्के चिनची आहे. भारतात जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 18 टक्के लोक जगतात. परंतू भारताची उत्पादन क्षमता 2.8 टक्के आहे. तरी म्हणे की, आम्ही विश्र्वगुरू आहोत. भारताच्या जीडीपीमध्ये घेतलेल्या उत्पादन क्षमतेची आकडेवारी सन 2015 मध्ये 15.7 टक्के होती. ही उत्पादन क्षमता सन 2019 मध्ये 13.4 टक्के झाली आणि सन 2023 मध्ये 12.93 टक्के झाली. भारताच्या उत्पादन क्षमतेची स्थिती दर पाच वर्षाला खालीच येत गेली. दरम्यान कोरोना काळ आला. कारखान्यांनी धुरओकणे बंद केले होते. सर्व काही लॉकडाऊन झाले होते. पण याच कालखंडात गौतम अडाणीची कमाई 1 हजार कोटी रुपये प्रतिदिवसाप्रमाणे वाढलेली आहे आणि अंबानी कुटूंबियांचे संपत्ती 90 कोटी रुपये प्रति तासाला वाढलेली आहे. काय बनवत असतील हे आणि काय विकले असतील त्यांनी हे शोधायचे असेल तर पीसी सरकारपेक्षा मोठा जादुगार आणावा लागेल. जीव्हीए (ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड) प्रमाणे मागच्या दहा वर्षाच्या कालखंडात भारताचे उत्पादन क्षमता 14.17 टक्क्याने खाली आली आहे. यालाच अमृतकाळ म्हणायचा काय? भारतातील विविध कुशल आणि अकुशल कामगार विदेशाकडे जात आहेत. त्यांनी जसे भारत छोडो आंदोलनच सुरू केलेले आहे.
शेतात खताचे पोता रिकामे झाल्यावर तपासून पाहा त्यावर मेड इन चायना लिहिलेले आहे. निवडणुक वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएममधील चिप सुध्दा मेड इन चायना आहे. आम्ही वापरतो ते कॅमेरे,ट्रायपोन, माईक, संगणक, मोबाईल हे सर्व विदेशी उत्पादन आहेत. का बनत नाहीत हे भारतात, का बनवले नाही भारताने असे अनेक प्रश्न जागतिक बॅंकेच्या सर्व्हेक्षणानंतर स्वत:ला विचारण्याची गरज आहे. आमचे लिखाण वाचल्यानंतर एकदा घरात आपल्या प्रत्येक वस्तुची तपासणी करा आणि त्यातील किती मेड इन इंडिया आहेत हे तपासा की, सुटे भाग आणून ती वस्तु तुम्हाला बनवून देण्यात आली आहे यावर आत्मपरिक्षण करा.10 वर्षात देशाला सोने की, चिडीया बनाऊंगा हे घोष वाक्य कोठे विरुन गेले हे कळलेच नाही. भारताच्या कुंभमेळ्यात स्नान करणे, एखाद्याला बालक बुध्दी म्हणणे, कोणाला रेनकोट स्नान करतो म्हणणे ही तुमच्या ताकतीची आणि प्रगतीची अवस्था नाही. माझ्या पणजोबाकडे हत्ती होता हे सांगण्यासाठी मला आजही हत्तीला बांधलेला साखळदंड सांभाळावा लागत आहे आणि तो दाखवून मी जगाला दाखवतो की, माझ्या पणजोबाकडे असे होते असेच काही तरी सत्ताधीश करत आहेत. कधी होता आणि आता आहे यात मोठा फरक आहे. चर्चा आताचीच होईल, नेहरू ऐराची नव्हे. इंडिया किती स्टार्टअप झाला , किती स्टॅन्डअप झाला हे खऱ्या अर्थाने तपासा तर सत्य आपोआपच समोर येईल.
जागतिक उत्पन्नाच्या तुलनेत भारताची उत्पादन क्षमता फक्त 2.8 टक्के ; असा आहे भारत विश्र्वगुरू
