नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या 496 पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती दिली आहे. या आदेशावर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना यांची स्वाक्षरी आहे.
राज्यातील पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीसाठी बऱ्याच वेळेस लढा देण्यात आला. त्यानंतर शासनाने, गृहविभागाने दिलेल्या सुचनेनुसार पोलीस अंमलदारांच्या 25 टक्के कोट्यातील निशस्त्र पोलीस उपनिरिक्षक गट-ब(अ राजपत्रीत) या पदावर 496 पोलीस अंमलदारांना नियुक्त्या दिल्या आहेत. त्यातील नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपनिरिक्षक या पदावर नियुक्ती मिळालेले. पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. त्यांची जुनी नियुक्ती दिली आहे. अविनाश केरबा बनाटे (परभणी), धनंजय माणिकराव देशमुख (नंादेड), चांदराव मारोतराव साखरे, गजेंद्र गोविंदराव मांजरमक, चंद्रकांत गंगाधरराव पांचाळे, विठ्ठल काशीनाथ दावलबाजे, संजय नन्हु मुंडे, प्रल्हाद संभाजी हैबतकर, शेषराव विठ्ठलराव येनगंठे, अशोक किशन बनसोडे, अजय कुलभूषण साखळे, सोमनाथ गंगाधर अप्पा स्वामी, उत्तम किशनराव गुट्टे, संभाजी विठ्ठलराव हनवते, बसवंत बागवन्ना मुत्तेपोड, गंगाधर लालू गायकवाड, दत्ता तुकाराम वाणी, कृष्णा जगदीश सुर्यवंशी, सुधीर भालचंद्र खोडवे (नांदेड), मधुकर पुंडलिकराव नागरे(हिंगोली) यांचा समावेश आहे. नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमधील काही पोलीस अंमलदारांना नांदेड पोलीस परिक्षेत्र वगळून राज्यातील इतर पोलीस परिक्षेत्रामध्ये नियुक्ती दिली आहे.
वाचकांच्यासोयीसाठी पोलीस उपनिरिक्षक झालेल्या 496 पोलीस अंमलदारांची यादी पीडीएफ संचिका बातमीसोबत जोडली आहे.
psi_promo_100225_250210_150738
