नांदेड(प्रतिनिधी)-वसंतराव नाईक चौकात आपल्याकडील अवैध अग्नीशस्त्रासोबत चुकीची हाताळणी करून आपल्याच पायाच्या मांडीवर गोळीमारून घेणाऱ्या दोन जणांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरिक्षक शिवाजी दत्तात्रय गुरमे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 फेबु्रवारीच्या रात्री 8 वाजेच्या जवळपास या वेळेत वसंतराव नाईक चौक येथील मच्छीमार्केेटजवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरात रोशन सुरेश हाळदे आणि ओमकांर हनमंत मार्लेवार या दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या अवैध अग्नीशस्त्र अर्थात पिस्तुल सोबत चुकीची हाताळणी करून स्वत:च्या पायाच्या मांडीवर गोळीमारून घेतली आणि पोलीसांची दिशाभुल करत दुसऱ्याने गोळीमारल्याचे सांगू लागले. स्वत:च्या निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या जीवास धोका होईल असे कृत्य केले. शिवाजीनगर पोलीसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 125(ब), 110, 212, 3(5) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 नुसार दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 51/2025 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक शिवाजी गुरमे अधिक तपास करीत आहेत.
