नांदेड(प्रतिनिधी)-निर्मल जिल्ह्याच्या दोन सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद येथे येवून 110 पोतेे स्वस्त धान्याचा तांदुळ किंमत 1 लाख 5 हजार रुपयांचा नांदेड पोलीसांच्या मदतीने जप्त केला आहे. एका आरोपीला ते आपल्या सोबत घेवून गेले आहेत.
भैसा जि.निर्मल तेलंगणा येथील गुन्हा क्रमांक 44/2025 च्या तपासासाठी निर्मल जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.जानकी शर्मिला यांच्या मार्गदर्शनात भैसा शहरातील सहाय्यक पोलीस अधिक्षक अविनाशकुमार आणि निर्मल शहरातील सहाय्यक पोलीस अधिक्षक राजेश मिना हे आपले पोलीस अधिकारी मलेश, गणेश आणि इतर पथकांसह धर्माबाद येथे आले. त्यांनी धर्माबाद येथील पोलीस निरिक्षक साहेबराव रोकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक प्रियंका पवार, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार विठ्ठल सुपारे, किरण मोरे यांच्या मदतीने धर्माबाद येथील शेख अजीम शेख रहिम यास ताब्यात घेतले. त्यांची भुसार दुकान गरीब नवाज या नावाची आहे. ती छत्रपती चौक धर्माबाद येथे आहे. गुन्हा क्रमांक 44/2025 शी संबंधीत 110 पोतेे, 3 हजार 500 किलो स्वस्त धान्याचा तांदुळ जप्त केला. शेख अजीम शेख रहिमला सोबत घेवून तेलंगणा पोलीस पुन्हा आपल्या राज्याकडे रवाना झाली आहे.