नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी वाळू माफियांवर कार्यवाही करत दोन लोखंडी बोटी इंजिनसह 105 ब्रास रेती, जेसीबी मशीन आणि लोखंडी क्रेन असा 57 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आणि 5 लाख 25 हजार रुपये किंमतीचे तराफे नष्ट करून टाकले. चार जणांविरुध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मांटे, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बालाजी कदम, विलास कदम, संदीप घोगरे, घेवारे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव गवळी आणि पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर तिडके आदींनी 6 फेबु्रवारी रोजी दुपारच्या वेळेत मौजे विष्णुपूरी शिवारातील गोदावरी नदी काठावर मौजे कल्लाळ गावात छापे टाकले. त्या ठिकाणी नदीपात्रातून वाळू उपसा केला जात होता. पोलीसांनी 20 लाख रुपये किंमतीच्या दोन बोटी त्यातील दोन इंजिन 5 लाख रुपयांचे 105 ब्रास रेती 5 लाख 25 हजार रुपयांची 20 लाख रुपये किंमतीची जेसीबी मशीन, 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे तीन लोखंडी क्रेन, 20 हजार रुपये किंमतीचे 5 लोखंडी पाईप असा एकूण 57 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तेथे सापडलेले 15 तराफे किंमत 5 लाख 25 हजार रुपयांचे जागीच नष्ट केले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव विठ्ठल गवळी यांच्या तक्रारीवरुन चंद्रा गोविंद क्षीरसागर, भानुदास यशवंत क्षीरसागर, मंटेसिंघ सर्व रा.कल्लाळ ता.जि.नांदेड आणि शेख मेराजोद्दीन शेख निजामोद्दीन रा.विष्णुपूरी नांदेड या चार जणांविरुध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गडवे आणि पोलीस उपनिरिक्षक चव्हाण हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी रेती माफियांवर कार्यवाही करून 54 लाखांचा मुद्देमाल जप्त केला
