नांदेड-त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात नांदेड येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश दादा सोनाळे यांचे चिरंजीव शुभम सोनाळे व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले.
शुभम सोनाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवतात. ज्यामध्ये आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो व 26 जानेवारी रोजी बाईक रॅली अशा अनेक उपक्रमांचा समावेश असतो.
या कार्यक्रमाला भंते पय्याबोधिजी,आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश दादा सोनाळे व अन्य मान्यवर उस्थितीत होते.
