नांदेड : -गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी नुक्तीच जत्थेदार पदावर पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. याप्रसंगी नांदेड मध्ये भव्य स्वरुपात सेवपूर्तिचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. याचे स्मरण म्हणून संतबाबा कुलवंतसिंघजी यांचे शालेय मित्रपरिवारातर्फे मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी श्री गुरु ग्रंथसाहेबजी भवन येथे भव्य असे सत्कार करण्यात आले. यावेळी स. जसपालसिंघ तबेलेवाले, स. रचपलसिंघ शाहू, स. जसवंतसिंघ शाहू, स. अमरजीतसिंघ पटवारी, स. किरपालसिंघ हजुरिया, स. दीपकसिंघ गल्लीवाले, स. दर्शनसिंघ तबेलेवाले, स. दीपसिंघ बंड, स. कश्मीरसिंघ हंडी, स. रघुबीरसिंघ शाहू, स. जसपालसिंघ बसरीवाले, स. रघुबीरसिंघ बाऊडीवाले, स. गुरबचनसिंघ बंड, स. बिरेंदरसिंघ बुंगाई, स. गोबिंदसिंघ सिद्धू, स. जसपालसिंघ लांगरी, स. राजेंद्रसिंघ बासरीवाले, स. दुर्लभसिंघ बुंगाई, श्री श्रवणकुमार वाधवानी, स. जितेंदरसिंघ संत, स. लक्षमनसिंघ भोसीवाले, स. अमरजीतसिंघ सिद्धू, स. रविंदरसिंघ लांगरी, कुलदीपकौर लिखारी, हरमिंदरकौर गल्लीवाले, सुदाम नंदिनी, स. सुखवंतकौर धारीवाल, करतारकौर संधू, पलविंदरकौर लिखारी, प्रकाशकौर फौजी, रविंदरकौर, गोबिंदाकौर रागी, दलजीतकौर तोपची, पवनजीतकौर, प्रकाशकौर आदींची उपस्थिती होती. संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी सर्वांचे आभार मानले.
More Related Articles
स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षकाची जबर कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील 1995 आणि 2002 पासून फरारी आणि पाहिजे असलेल्या सदरातील दोन जणांना स्थानिक…
वजिराबाद पोलीसांनी 20 किलो गांजा पकडला ; महिला आणि पुरूषाला 23 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात न्यायालयाच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला आणि एका पुरूषाला पकडून…
भूकंपाची तीव्रता 4.7
नांदेड (जिमाका)-आज दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी…
