नांदेड(प्रतिनिधी)-समर्थ अपार्टमेंट, स्वामी समर्थनगर मंदिर मालेगाव रोड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शिवाजी कंठीराम विभुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारीच्या सकाळी 10 ते 10.15 अशा फक्त 15 मिनिटाच्या कालखंडात कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख 60 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या घटनेबाबत गुन्हा क्रमांक 75/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.
स्वामी समर्थमंदिराजवळ घरफोडून 3 लाख 60 हजारांची चोरी
