नांदेड(प्रतिनिधी)-दि.7 फेबु्रवारी रोजी माताई रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात उपासकांनी मोठ्या संख्येत भाग घ्यावा असे आवाहन आयोजक मंगेश खंडागळे यांनी केले आहे.
येत्या 7 फेबु्रवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांचा 127 वा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना भारतीय संविधान प्रस्ताविका प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भदंत पय्याबोधीजी थेरो यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात आ.आनंदराव बोंढारकर, बापूराव गजभारे, प्रा.राजू सोनसळे, गणेश शिंगे, सुभाष काटकांबळे, रमेश चित्ते, प्रकाश रोकडे, सत्यपाल सावंत, राहुल चिखलीकर, अविनाश गायकवाड, राहुल घोडजकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपासकांनी जास्तीत जास्त संख्येत रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन मंगेश खंडागळे यांनी केले आहे.
माता रमाई जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
