श्रध्देला इव्हेंट केल्यामुळे महाकुंभात महाशोक पसरला

रामप्रसाद खंडेलवाल
150 वर्षानंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरा चेंगरी होवून जवळपास 25 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी, खा.प्रियंका गांधी, खा.अखिलेश यादव, यांनी ट्विटरवर या घटनेचे दु:ख व्यक्त केल्यानंतर खून उशीराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथसिंह आदींनी या घटनेचा उल्लेख करून दु:ख व्यक्त केले. पण तेथे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख केला नाही. उत्तर प्रदेशचा एक मंत्री तर म्हणतो अशा मोठ-मोठ्या आयोजनामध्ये छोट-छोट्या गोष्टी घडत असतात. असाच प्रकार ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री नाही अशा राज्यात घडला असता तर जाहीरातींच्या नोटा आपल्या तोंडात कोंबुन घेतलेल्या मिडीयाने त्या मुख्यमंत्र्याला सायंकाळपर्यंत फाशीवर चढवले असते. श्रध्देला इव्हेंट केल्यामुळे या महाकुंभाची मौनी आमावस्या अनेकांसाठी काळ ठरली, अनेकांचे नातेवाईक हरवले आहेत, त्यांना आपल्या घरी जाण्याची वणवण झाली आहे. म्हणूनच 1832-1904 या कालखंडातील लेखक आणि पत्रकार रिचर्ड ऍर्नाल्ड म्हणाले होते की, सत्ताधीशांना जे छापून यावे असे वाटत नाही ते छापणेच खरी पत्रकारीता आहे.


150 वर्षानंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्याची तयारी, यात होणाऱ्या सर्व सुविधा आणि कसे भव्य आयोजन आहे हे दाखविण्यात मागचे सहा महिने घालविलेल्या गल्ले भरू मिडीयाने रात्री घडलेला प्रकार सर्वसामान्य जनतेसाठी दाखवलाच नाही. तर आजही या आयोजनाची भव्यता कशी आहे. हे दाखविण्यातच पुन्हा एकदा आपली मान स्वत:च खाली घालून घेतली. यात दोनच वाघ निघाले. एक एबीपीचा पत्रकार विशाल आणि दैनिक भास्कर यांनीच कुंभ मेळाळ्यातील घटनेच्या सत्यता दाखविल्या. बाकी इतर जास्त संख्येतले पत्रकार योगी आणि मोदीच्या शेळ्या बनून आताही पत्रकारीता करत आहेत. हजार दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा ही म्हण काही खोटी नाही. आज पौष आमास्या अर्थात मौनी आमावस्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात आलेल्या भक्तांची श्रध्दा असते की, त्यांनी त्रिवेणी संगमावर स्नान करावे आणि यासाठीच ते धडपड करून तेथे पोहचले होते. रात्री 10 वाजल्यापासून त्रिवेणी संगमावर भाविकांनी हळूहळू जमायला सुरूवात झाली आणि रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान तेथे गर्दीचा दबाव एवढा वाढला की त्या अगोदर जे भाविक अमृतवेळेची वाट पाहत होते. अर्थात सकाळी 4 ते 6 या वेळेला अमृतवेळ असे म्हणतात. पण ती वेळ येण्याअगोदरच तेथे काही लोक ज्याच्यात महिला, पुरूष, वृध्द, बालके यांचा समावेश होता. ती सर्व मंडळी झोपली होती. कारण त्यांना अमृतवेळेची वाट पाहायची होती. पण वाढलेल्या गर्दीच्या दबावाने दुसरा एक रस्ता खुला असतांना प्रशासनाने तो उघडला नाही आणि गर्दीच्या दबावाने बॅरीकेट तुटले आणि झोपलेल्या लोकांच्या अंगावरून त्यांना तुडवत गर्दी पुढे पळाली. या प्रसंगी एक प्रशासनिक अधिकारी ध्वनीक्षेपकावर सांगत होता की, आता तुम्ही लवकर आला आहात. तर लवकर अंघोळ करून घ्या. पण श्रध्देमध्ये अमृतवेळ सुनिश्चित आहे. आजपासून पुर्वी हजारो वर्षापासून सुरू असलेला हा कुंभमेळा चालतच आलेला आहे. सन 2004 मधील नाशिक कुंभमेळ्यामध्ये एका नागासंताने चांदीच्या शिक्यांची उधळण केली होती आणि ते शिक्के मिळविण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीत सुध्दा चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी प्रशासनाने त्या संता विरुध्द गुन्हा दाखल केला होता आणि काही दिवसानंतर त्यांना अटक करुन नाशिक न्यायालयात सुध्दा आणण्यात आले होते आणि आता या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत कोणी 12 म्हणते, कोणी 15 म्हणते, कोणी 25 म्हणते तर कोणी 25 पेक्षा जास्त म्हणते. एवढ्या भाविकांचे मृत्यू झाले आहेत. अनेक भाविक एक दुसऱ्यापासून दुरावले आहेत, त्यांचे सामान हरवले आहे, त्यांच्याकडे पैेसे नाहीत, आता त्यांना परत आपल्या गावी पोहचण्याची वणवण लागली आहे. महाराष्ट्रातील एक भाविक सांगत होता आणि आपल्या मराठ मोळ्या भाषेत योगीबद्दल बोलत होता आणि पत्रकारांना विचारत होता की, मी आणि माझे कुंटूब परत कसे जाणार.
घटना घडल्यानंतर आकांक्षा राणा नावाची प्रशासकीय अधिकारी सांगत होती की, एक छोटीशी घटना घडली आहे. त्यात काही लोक जखमी आहेत. पण झालेल्या मृत्यबद्दल ती काही एक बोलत नव्हती. दरम्यान विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी, खा.प्रियंका गांधी, खा.अखिलेश यादव यांनी कडक शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला, मरणाऱ्या लोकांना श्रध्दांजली अर्पण केली, एक दुसऱ्यापासून दुरावलेल्या लोकांसाठी संवेदना व्यक्त केली आणि सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली की, या सर्व लोकांची मदत व्हावी आणि पुढच्या कार्यक्रमासाठी दक्षता घ्यावी. या संदर्भाने आझाद पार्टीचे खा.चंद्रशेखर रावण म्हणाले, श्रध्देला इव्हेंट केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. धार्मिक आयोजनात फक्त व्हीव्हीआयपीसाठी सर्व सुविधा आहेत. व्हीव्हीआयपींच्या चार चाकी गाड्या वाहन ताफ्यासह त्रिवेणी संगमावर वाहनतळ होतात आणि लोकशाहीमधील सर्वात महत्वाचा केंद्र बिंदू असलेला सर्वसामान्य माणुस रेल्वे स्थानक अथवा बसस्थानक तेथून 15 ते 20 किलोमिटर पायी चालून त्रिवेणी संगमावर येतो. म्हणजे हा कुंभमेळाचा सोहळा जनतेसाठी होता की, फक्त व्हीव्हीआयपींसाठी होता असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
निरंजनी आखाडाचे महामंंडलेश्र्वर स्वामी ब्रम्हानंद पुरी सांगतात प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे हे घडले आहे. कोणाचा वडील गेला, कोणाची आई गेली, कोणाचा मुलगा गेला, कोणी पत्नी गेली, कोणाचा नातू गेला ही घटना भयंकर आहे. मोदींजींनी आता हे व्यवस्थापन भारतीय सैन्याकडे द्यावे. हे सांगतांना ते रडत होते. पण पुढे शाहीस्नान चांगले होतील अशी अपेक्षा सुध्दा महामंडलेश्र्वर स्वामी ब्रम्हानंदजी पुरी यांना आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी ट्विट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आप-आपले वक्तव्य जाहीर केले. त्यात त्यांनी फक्त घटना सांगितली. पण झालेले मृत्यू नाही आणि पुढचा कुंभमेळ्याचा सोहळा योग्य होईल असे सांगितले आणि त्यासाठी प्रशासनाने काय-काय तयारी केलेली आहे हेच सांगितले. यानंतर कुंभमेळा परिसरातील एसएसपी राजेश द्विवेधी सांगत होते की, येथे घडलेल्या घटनांची माहिती स्थानिक पोलीस देईल. अत्यंत सुगम वातावरणात कुंभमेळ्याचे स्नान सुरू आहे. मृत्यू बद्दल विचारणा केली तर ते सांगतात. मला कुंभमेळ्याची व्यवस्था पाहायची आहे. मृत्यूची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही. ती स्थानिक पोलीसांकडे असेल. उत्तर प्रदेश एक मंत्री संजय निशाद सांगतात अशा मोठ-मोठ्या आयोजनात छोट-छोट्या गोष्टी घडत असतात. बहुतेक संजय निशादला हे माहित नसेल असेच वक्तव्य 2008 च्या मुंबई हल्यात महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी दिले होते. आर.आर.पाटील उत्कृष्ट व्यक्तीमत्व असतांना सुध्दा त्यांना या वक्तव्यासाठी राजीनामा द्यावा लागला होता. काही तासातच त्यांनी आपला शासकीय बंगला रिकामा करून मुंबई सोडली होती. पण ते भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री नव्हते. म्हणूनच संजय निशादवर काही कार्यवाहीची शक्यता ही अवघडच आहे.
रिचर्ल्ड अर्नाल्ड यांनी सांगितल्याप्रमाणे या कुंभमेळ्यातील चुकीच्या गोष्टी सर्व मिडीयाने चांगल्यापणे दाखविल्या असत्या तर सरकारला त्याची दखल घ्यावी लागली असती. पण भारतीय पत्रकारीतेतील काही लोक नपुसक झाल्याने ते दाखवले नाही आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली. आता संध्याकाळच्या वेळेस तर गोदी मिडीयाने पुन्हा एकदा कुंभमेळ्याची भव्यता दाखविण्याची जोरदारपणे कार्यवाही सुरू केली आहे. पण या सर्व कार्यवाहीमध्ये विशाल या वाघासमोर एक वृध्द व्यक्ती माझी पत्नी गायब झाली आहे. हे रडत-रडत सांगतांना ही घटना दाखविण्यासाठी वाघीनीचेच दुध प्यावे लागते.
सोर्स: अभिसार शर्मा, अजित अंजूम..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!