नांदेड :- ‘ समग्र शोषित भारतीयांच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या संघर्षाचे वास्तव चित्रण करणाऱ्या एकाहून एक दर्जेदार आंबेडकरी नाटकांची निर्मिती आणि त्यांचे तीन दशकांपासून समर्पित वृत्तीने शेकडो प्रयोग करत डॉ.विलासराज भद्रे आणि त्यांच्या आई क्रिएशन्स ह्या नाट्य संस्थेने एकीकडे आंबेडकरी सांस्कृतीक चळवळ समृद्ध केली आणि सोबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून दर्जेदार आणि प्रगल्भ कलावंतांच्या दोन पिढ्या घडवल्या.हे कार्य कौतुकास्पद आहे ‘ असे प्रतिपादन मान्यवरांनी ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिर समारोप ‘ आणि ‘ रणसंग्राम ‘ ह्या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यात केले.
ह्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी,विचारवंत प्रा.डॉ.देविदास मनोहरे,उद्घाटक म्हणून शास्त्रज्ञ प्रा.डॉ.भास्कर दवणे,प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे,ज्येष्ठ अभिनेते,दिग्दर्शक डॉ.विजयकुमार माहुरे,ज्येष्ठ अभिनेत्री डॉ.मंदाकिनी माहुरे आणि ‘ चला हवा येवू द्या ‘ फेम हास्यसम्राट सतीश कासेवार हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ तथागत गौतम बुद्ध,प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष प्राचार्य अमृतराव भद्रे ह्यांच्या प्रतिमांचे पूजन करून आणि संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाला.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बोधीवृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर संविधान रक्षक आणि संविधान भक्षक ह्यांच्यातील संघर्षाचे ज्वलंत चित्रण करणाऱ्या डॉ. विलासराज भद्रे लिखित,दिग्दर्शित ‘ रणसंग्राम ‘ ह्या नाटकाचे उद्घाटन प्रा.देविदास मनोहरे ह्यांनी नाटकातील एक पल्लेदार संवाद सादर करून केले.
ह्यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्मृतीशेष आर.आर. भास्करे ह्यांना ह्या सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली.नंतर मान्यवरांचे स्वागत पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य पद्माकर जोंधळे, गंगाधर झिंझाडे,निवृत्तीराव झडते,सुनील नेत्रगावकर, कृष्णा गजभारे,प्रतिभा सोने,शेषेराव हणमंते आदींनी केले.ह्या सोहळ्यात प्रा. हास्यसम्राट सतीश कासेवार ह्यांनी आपल्या मनोगत आणि सदाबहार मिमिक्रीने रसिकमने जिंकली.
१ ते १४ जानेवारी २०२५ ह्या कालावधीत उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या ह्या शिबिरासाठी महाप्रजापती माता गौतमी बुद्ध विहार, श्रावस्तीनगरचे सभागृह देऊन सहकार्य करणारे अशोकराव काकांडीकर आणि पूजा महिला मंडळ अध्यक्षा लिंबाबाई कोसरे ह्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष आणि शिबिराचे मुख्य संयोजक डॉ.विलासराज भद्रे ह्यांनी प्रास्ताविक केले.आई क्रिएशन्सच्या विद्यार्थी कलावंतांच्या वतीने सुप्रसिध्द नाट्य निर्माते ज्योतिबा हनुमंते यांनी तर शिबिरार्थी सिद्धार्थ कांबळे,प्रांजल मोतीपवळे यांनी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.भीमशाहीर आनंद किर्तने ह्यांनी स्मृतीशेष प्राचार्य अमृतराव भद्रे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शिबिरात सहभागी कलावंतांना आकर्षक प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.ह्यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून आनंद कांबळे आणि उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून प्रांजल मोतीपवळे ह्यांना गौरवण्यात आले. तेजाब पाईकराव आणि बाल कलावंत अर्णव गोलेर यांनी प्रभावीपणे एकपात्री अभिनय सादर केला.
डॉ.विजयकुमार माहुरे ह्यांच्या निवासस्थानी ‘ संवाद ‘ सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या ह्या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन कुलदीप नंदूरकर यांनी केले.तर आभार अरविंद गवळे यांनी मानले.
ह्या अविस्मरणीय सोहळ्याच्या यशस्वितेसाठी साहेबराव शेळके, सत्यपाल नरवाडे,शंकर गायकवाड,आकाश भालेराव,आयु.छायाताई कांबळे ,प्रतीक्षा गजभारे आदींनी परिश्रम घेतले.
ह्या सोहळ्यास विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर एन. डी.गवळे,दिगंबरराव मोरे, डी.डी.भालेराव,श्रावणकुमार शिंदे,युवराज मोरे,माधवराव जमदाडे,के. एच.वने,मधुकर झगडे,डॉ.रमेश देवके,ऍड.केशव हणमंते,निशांत सोने, एस.जे.शिरसे, आर.के.सामी,विजय डोईबळे,मंगेश गोलेर,अनुज चौदंते,आदित्य आढाव आदी उपस्थित होते.