नवीन नांदेड – पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे विधीवत पूजन करून गोदावरी नदीच्या काठावर 29 जानेवारी ग्रामीण व शहरी भागातील हजारो नागरिक भाविक भक्त महिलांनी दर्शमौनी अमावस्या निमित्ताने शाही स्नान करून दर्शन केले यावेळी काळेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने व ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दर्शमौनी अमावस्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहून काळेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने पार्किंग व्यवस्था व घाट परिसरात स्वच्छता साफसफाई करण्यात आली होती,तर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी व पाच पोलीस अधिकारी यांच्या बंदोबस्त ठेवण्यात आला होता,तर महसुल प्रशासनाच्या वतीने नांदेड तहसील संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुपुरी मंडळ अधिकारी कानगुले यांनी मंदिर परिसर सह गोदावरी नदी घाटावर पाहणी केली , विष्णुपुरी ग्रामपंचायत सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक धारोजी हंबर्डे,युवा नेते नरसिंग हंबर्डे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती तर गावातील नागरिक व युवक महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सकाळपासून मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील अनेक गावांतील महिला पुरुष भाविक भक्त तर शहरी भागातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने चारचाकी तिनं चाकी, दुचाकी वाहनाने व दिंडीचा सहाय्याने हजारो भाविक भक्त स्नानासाठी दाखल झाले, गोदावरी नदीच्या काठी विधीवत पूजन व स्नानासाठी सर्व घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, यावेळी अनेकांनी बोटीच्या सहाय्याने जलाशयात फेरफटका ही मारला, सकाळपासून होणारी गर्दी दुपारी ही मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
महिलांनी गोदावरी नदीच्या काठी श्रीफळ ओटी भरून पुजन करून काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.