नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

नांदेड,(जिमाका)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नांदेड येथील नांदेड येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना पुस्तक भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले.यावेळी बोलताना मिनगीरे यांनी मराठी भाषा संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषेचे जतन व्हावे, प्रचार प्रसिद्धी व्हावी, या उद्देशाने राज्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी भाषेचे ज्ञान राहील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

प्रख्यात व्याख्याते नितीन कसबे यांनी देखील यावेळी मराठी संवर्धनाच्या संदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रचालक केंद्र सूत्रसंचालन कैलास चंद्र गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महानगर वाचनालयाचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!