नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वज फडकावण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. मोहम्मद शकील, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी याच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत ललित व कला संकुलाच्या विद्यार्थ्यांनी गायीले.