एखादी सत्यता आपण खुप दिवसांपर्यंत कोणाकडून लपवू शकत नाही. ही म्हण आहे. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी भारताच्या निमंत्रणावर शासकीय अतिथी म्हणून प्रोबोबो सुबीयांटो भारतात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यंाच्यासमोर नरेंद्र मोदी यांचा आजपर्यंतचा खोटारडेपणा उघड पाडाला. यानंतर तरी नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि इतर पंतप्रधानांबद्दल जो खोटा प्रचार करतात तो करणार नाहीत. पण आम्हाला ही वाटते असे घडणार नाही आणि आमच्या वाचकांना सुध्दा याची 100 टक्के खात्री असेल की नरेंद्र मोदी असे करणार नाहीत.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख अतिथी पदावर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोबो सुबीयांटो यांना निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रण आल्यानंतर प्रोबोबो सुबीयांटो यांनी लवकरच प्रतिसाद दिला नव्हता. परंतू अखेर ते भारताचे शासकीय अतिथी म्हणून भारतात आले. पहिल्याच दिवशी त्यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील समाधीवर जाऊन दर्शन घेतले होते. यावरुन भारताशिवाय जगात महात्मा गांधी यांची काय ख्याती आहे हे दिसते. परंतू आज भारतीय जनता पार्टीचे काही प्रवक्ते खुलेआमपणे नथुराम गोडसे यांचे महिमामंडन सार्वजनिक ठिकाणी करतात हे किती दुर्देवी आहे.
2014 पासून भारतीय राजकीय समिकरणात मोठे बदल झाले. भाजपाच्या खासदार कंगणा राणावत यांनी तर स्पष्टपणे सांगितले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालेच नव्हते. ते स्वातंत्र्य सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्र्रधान झाल्यानंतर देशाला प्राप्त झाले आहे. नरेंद्र मोदी सुध्दा भारतात किंवा विदेशात अनेक ठिकाणी सार्वजनिक रित्या भारतातील प्रत्येक समस्येसाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुच जबाबदार आहेत असे सांगतात. यावर डोके बडवून घ्यावे वाटते. 1947 मध्ये भारतासह अनेक देशांना स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. त्यानंतरच्या त्या देशांमधील लोकशाहीची अवस्था पाहिली तर आजही आपल्या डोळ्यात अश्रु येतील. पण भारत 1951-52 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2024 च्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत ताकतवान बनत गेला आणि भारताची प्रगती पाहुनच जगभरात सर्वात मोठी प्रगल्भ लोकशाही म्हणून भारताचा उल्लेख होतो. या प्रगल्भतेला पंडीत जवारलाल नेहरुचा हातभार नक्कीच आहे. पंडीत नेहरुंनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अगोदर लढाई लढली. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर चालता येण्याची परिस्थिती नसणाऱ्या देशाला जगात पुढे आणले आणि म्हणूनच आज जगभरात भारताचे नाव उच्च स्तरावर आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोबो सुबीयांटो भारतात आल्यानंतर राज भवनामध्ये राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पत्रकारांशी बोलताने म्हणाले भारताने इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेली साथ आम्ही कधीच विसरणार नाही. त्यावेळी सुध्दा पंतप्रधान जवाहरलाल नेहरु होते. भारत हा एकच देश होता ज्याने इंडोनेशियाचे स्वातंत्र्य मान्य केले होते. इतर देशांनी त्याला मान्यता दिलेली नव्हती. त्यावेळेस सुध्दा पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु होते. यानंतर प्रोबोबो सुबीयांटो हैद्राबाद हाऊसमध्ये दोन देशांच्या बैठकीत सुध्दा बोलतांना भारताची आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची प्र्रशंसा करत होते. त्यांनी सांगितले की, इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो हे भारताच्या प हिल्या गणतंत्र दिवस परेडचे प्रमुख अतिथी होती. त्यावेळी इंडोनेशियाच्या सैन्य तुकडीने देशाबाहेर अर्थात भारतात परेडमध्ये सहभाग घेतला होता. भारताच्या मदतीचा परिणाम इंडोनेशियावर असा झाला की, इंडोनेशियाने तेथील भारतीय दुतावासासाठी भेटमध्ये जमीन दिली. 1958 मध्ये तटस्थ देशांचा संस्थापक देश भारत होता. त्यावेळी सुध्दा भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु होते. आजही तटस्थ भुमिका असणाऱ्या देशांमध्ये भारत हा सर्वोच्च विचारश्रेणीचा देश आहे असे मानले जाते.
आजच्या परिस्थितीमध्ये अमेरिका देश किंबहुना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प हे भारताला नव्हे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झटका देण्याच्या अनेक आदेशावर स्वाक्षरी करीत आहेत. पुढे जगात असलेल्या राजकीय परिस्थितीनुसार रशिया चिनच्या समर्थनार्थ जाईल, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, भुटान, मॅनमार, मलेशिया यांच्या भुमिका भारत विरोधी झाल्या आहेत. या सर्व घटनांना कोणते पंतप्रधान जबाबदार आहेत हे ही नरेंद्र मोदींजींनी सांगितले तर छान होईल. यापुढे तरी नरेंद्र मोदी भारतात किंवा विदेशात भारताचे प्रथम पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि इतर पंतप्रधानांची बेअबु्र करणार नाहीत असे वाटते. पण असे घडणार नाही असे आमचेही मत आहे आणि आमच्या वाचकांचे मत आमच्यापेक्षा जास्त दृढ असेल.
सुकर्णो हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढाच्या वेळी सैन्य प्रमुख होते. नंतर पुढे ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती झाले. 1947 च्या इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असतांना सुकर्णो यांना भारतात यायचे होते. त्यांनी पंतप्रधान नेहरू यांच्यासोबत संपर्क साधला तेंव्हा अत्यंत धाडसी वृत्ती असलेल्या ओरीसाचे मुख्यमंत्री बिजेंद्रनाथ पटनाईक यांना स्वत: विमान चालवून जा आणि सुकर्णोला घेवून या असे सांगितले होते. तेंव्हा बिजु पटनाईक यांनी आपली पत्नी ज्ञानवती यांना सोबत घेवून विमान उडवले आणि इंडोनेशियामध्ये जाऊन सुकर्णोला सुखरुप भारतात आणले होते. हे काम सुध्दा प्रथम पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचेच आहे. त्यानंतर इंडोनेशिया देशात बिजु पटनाईक यांना सन्मानाचे नागरीकत्व देण्यात आले होते. भारतात आजही इंडोनेशियन दुतावासामध्ये एक कक्ष बिजु पटनाईक या ंच्या नावाचा आहे. त्यात बिजु पटनाईक यांचा इंडोनेशिय स्वातंत्र्य लढ्याशी काय संबंध आहे याचे चित्र प्रदर्शन दिसते.
सोर्स: न्युज लॉंचर, संतोष पाठक.