भोकर :-जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी बदल श्री गुरुगोबिंदसिंहजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या वतीने मा. अभिजीत राऊत साहेब जिल्हाधिकारी नांदेड व मा. डॉ निळकंठ भोसीकर साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या स्वाक्षरीचे
प्रशस्तीपत्र ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी भुलतज्ञ डॉ अनंत चव्हाण, डॉ बालासाहेब बिऱ्हाडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ सविता कांबळे, अधिपरिचारिका राजश्री ब्राम्हणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रीनंदन पांचाळ यांचा डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशस्तीपत्र मिळाल्या बदल भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष अंगरवार, डॉ नितीन कळसकर, डॉ अस्मिता भालके, डॉ मंगेश पवळे, डॉ सागर रेड्डी, डॉ महेश मंगरूळकर, डॉ शिल्पा कळसकर, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद होळगे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोलकर, मनोज पांचाळ, जाहेद अली, कठारे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, शिवप्रसाद जाधव, मल्हार मोरे, संदीप ठाकूर, गिरी रावलोड, सुरेश डुम्मलवाड, नामदेव कंधारे, अधिपरिचरिका जिजा भवरे, ज्योती शेंडगे, साधना भगत,संगीता महादेळे, सविता ताटेवार, वाटोरे, डवरे, प्रियंका बक्केवाड, छाया बोड्डेवाड, संगीता भालेराव, डी.एन भालेराव, मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, पवार, पोहरे, सेवक, शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या.