खा.चव्हाणांनी पत्रकारांच्या केलेल्या बेअब्रुबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पांडागळे कसा लढा देतील !

नांदेड(प्रतिनिधी)-खा.अशोक चव्हाण यांनी काल 25 जानेवारी रोजी भोकर येथील पाणी पुरवठा आढावा बैठकीत पत्रकारांची सार्वजनिकपणे केलेली बे अबु्र निंदनीयच आहे. प्रश्न असाही आहे की, मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख एस.एम. देशमुख यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेवर नेमलेले अध्यक्ष आता पत्रकारांच्या या बेअबु्रसाठी लढा देतील काय?
काल 25 जानेवारी रोजी भोकर येथे पाणी पुरवठा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, भोकर तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रा्रमविकास अधिकारी, गटविकास अधिकारी हे हजर होते. त्या बैठकीत पत्रकार सुध्दा गेले. पत्रकारांच्या कामकाजाप्रमाणे त्यांचे काही चुकले नाही. त्या बैठकीत ध्वनीक्षेपकाच्या माध्यमाने खा.अशोक चव्हाण यांनी चार वेळेस पत्रकारांनी या बैठकी बाहेर जावे अशी घोषणा केली. त्यावेळी सर्वच पत्रकारांना राग आला आणि सर्व तेथून निघून गेले. त्यानंतर पत्रकारांनी राज्यपालांना निवेदन पाठविल्याची माहिती खा.अशोक चव्हाण यांना प्राप्त झाली तेंव्हा त्यांनी काही पत्रकारांना आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोलावल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. तेथे त्या निवडक पत्रकारांसमोर कोण-काय बोलले आणि काय कबुल केले याला महत्व नाही. कारण पत्रकारांची बेअब्रु सार्वजनिकरित्या झाली होती.
जिल्ह्यातील कोणत्याही पत्रकाराला कठीण प्रसंग आला तर जिल्हा पत्रकार संघाने त्या पत्रकाराच्या किंवा पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे ही नैतिक जबाबदारी आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदावर मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी संतोष पांडागळे यांची नियुक्ती केली आहे. संतोष पांडागळे इंग्रजी शिकवणारे गुरूजी होते. खा. अशोक चव्हाणांच्या संस्थेत इंग्रजी शिकवता शिकवता ते पत्रकार पण झाले. सध्या ते शाळेत जातात की नाही हे देवच जाणे. एस.एम.देशमुख साहेब नांदेड जिल्ह्याच्या पत्रकारांनी खा.अशोक चव्हाण यांचेच कार्यकर्ते असलेल्या संतोष पांडागळेंकडून आपल्यासाठी लढा देण्याची अपेक्षा करावी काय? हे आपणच सांगावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!