जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बैठक

 

नांदेड: -राज्याची राजभाषा असलेला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक नुकतीच पार पडली.

 

राजभाषा मराठी आता अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त आहे. या भाषेचा वापर स्थानिक स्तरावर सर्व केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयाने करावा, पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय,महामंडळ, केंद्र शासनाच्या अख्यत्यारित असणारी सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी बँका, सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठी भाषेचा वापर वाढविण्यात यावा.

या पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावी अशी सूचना यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशासन तसेच मराठी भाषा समिती सचिव अजय शिंदे यांनी यावेळी केले.

 

जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आहेत. तर उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे सदस्य सचिव आहेत.या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनील सुर्यवंशी , रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी भाषेचे प्राध्यापक पृथ्वीराज तौर, व्याकरणतज्ञ श्रीमती प्रतीक्षा गौतम तालंगकर, प्रकाशक विनायक येवले, मराठी भाषेच्या संदर्भात काम करणाऱ्या विविध संस्था, प्रकाशन संस्था, भाषातज्ञ, विद्यापीठाचे मराठी भाषा प्रमुख, ग्रंथालय चळवळीतील मान्यवर, जिल्हा ग्रंथपाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यात विविध स्तरावर या संदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भाषा संवर्धन संदर्भात पुढील काळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या कार्यक्रमांमध्ये नवी दिल्ली येथे अॅट होम या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे मराठीचे प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!