संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या पंचवीस वर्षीय सेवेला संगतचे अद्वितीय आभार

संत बाबा कुलवंतजीच्यां पंचवीस वर्षे सेवा पुर्ती अद्वितीय एकमेव ऐतिहासिक कार्यक्रम संत बाबा कुलवंतसिंघजी संचखड गुरुद्वाऱ्याचे जत्थेदार ( मुख्य पुजारी) यांचा पंचवीस वर्षे सेवा पुर्ती समारंभ फार मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. या काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे नांदेडच्या जत्थेदाराचीं सेवा ही संपूर्ण जगभरातील सर्व कार्या पेक्षा वेगळी व फारच कठीण आणि चोवीस तासातुन सोळा ते अठरा तासा पर्यंत काम करने परंतु एक ही सुट्टी न घेता सेवा करावी लागते. तसेच पाठ पुजा करण्या सोबत सोबत सामाजिक व धार्मिक गोष्टी बद्दल सतर्क राहून वेळो वेळी सर्व समाजाच्या व शिख धर्माच्या हीताचे निर्णय घ्यावे लागतात. या समारंभात सामिल होण्यासाठी देश विदेशातील अनेक नागरिक आलेले आहेत. विशेष बाब म्हणजे आता पर्यंत साठ ते सत्तर महान सत्पुरुष साधु संत नांदेड मध्ये दाखल झालेले आहेत व ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार , डॉक्टर, वकील, व्यापारी असे सर्व स्तरातील लोकांची उपस्थिती लावली जाणार आहे. हा कार्यक्रम पी टी सी लाईव्ह वर थेट प्रक्षेपण व युट्यूब वर ही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नांदेडच्या शिख समाजाच्या लोकांच्या सोबत सोबत नांदेड प्रशासन ही फार उत्साहात व जोमाने काम करत असताना दिसले. या कार्यक्रमासाठी लोका मध्ये एवढा उत्साह येण्याचे कारण म्हणजे आज पर्यंत नांदेडच्या इतिहासात संचखड गुरूद्वाऱ्यात इ स 1708 पासून एकूण एकतीस जत्थेदार झालेले आहे. विशेष म्हणजे या एकतीस जत्थेदारा मध्ये फक्त व फक्त तीन नांदेडचे मुळ जत्थेदार झाल्याचे दिसून येते. या अगोदर संत बाबा मोनी बाबा जोगीदंरसिंघजी, संतबाबा हजुरासिंघजी व आजचे वर्तमान संतबाबा कुलवंतसिंघजी असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण या अगोदरच्या अठ्ठावीस जत्थेदाराच्या बाबतीत ते कुठले होते ही कुठे ही नोंद किंवा कधी पुर्वजा कडून त्यांच्या मुळ रहिवासी बाबतीत ऐकलेले नाही ‌. तसेच असा कार्यक्रम जो की जत्थेदार साहेबांचा प्रथमच पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्याचा कार्यक्रम झालेला ना. म्हणून ह्या कार्यक्रमास वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच या कार्यक्रमात बाबाजीनां शिख समाजात सर्वोच्च मानला जाणारा जस्सासिंघजी अहलुवालिया पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा सोबत मोफत विविध रोगांवर तपासणी शिबिर व उपचार करण्याचे शिबिर व डोळे तपासून आप्रेशन व चष्मे वाटप डॉ सब्बरवाल तेरा तेरा मिशन चंदीगडच्या तर्फे आयोजित करण्यात आला आहे. ह्या मध्ये डॉ संदेश मालू, डॉ उमेश देशपांडे, डॉ अर्जुन शेळके, डॉ मुकेश मालु, डॉ तुकाराम भालके, डॉ राहुल देशमुख व डॉ सुनील राठोड अश्या उच्च कोटीच्या डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. तसेच या कार्यक्रमस्थळी एक भव्य मैदानावर स्टेज व एक भव्य दिव्य असे बाबाजीच्या फोटोची प्रदर्शनी व श्री गुरु ग्रंथ साहीब जी भवनात येणाऱ्या भाविकांना उत्तम शाकाहारी जेवणाची सोय करण्यात आली आहे. येणाऱ्या यात्रेकरूंना राहण्याची चांगल्याप्रकारे सोय केलेली आहे. तरी सर्व लोकांना संतबाबा कुलवंतजी परिवार, गुरूद्वारा बोर्ड व समस्त शिख समाजाच्या वतीने आवाहन करण्यात येते की अशा भव्य दिव्य ऐतिहासिक समारंभात आपल्या परिवारा सोबत येऊन किर्तन, कथा व भोजनाचा आस्वाद घ्यावा.

– राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू

इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर नांदेड 770006399*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!