नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगर भागातील राज मॉल येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा खून झाला आहे. या संदर्भाने विमानतळचे पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विश्र्वास व्यक्त केला आहे की, आम्ही लवकरच मारेकऱ्यांना गजाआड करू.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी 7 वाजेच्या आसपास वजिराबाद पोलीस उपनिरिक्षकांना जारी केलेल्या पत्रानुसार त्यांच्याकडे आलेली व्यक्ती ही एमएलसी क्रमांक 449 प्रमाणे दाखल करून पुढील काम करावे. त्यांनी लिहिलेल्या पत्रानुसार साईनाथ प्रकाश कुळेकर (17) रा.विद्युतनगर हा अल्पवयीन बालक अर्थात पेशंट मृत अवस्थेत अपघात विभागात आला आहे. त्या संदर्भाची एमएलसी दाखल करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे पत्र पाविले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार राज मॉल, आनंद नगर येथे हा अल्पवयीन बालक रक्तबंबाळ अवस्थेत सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ, भाग्यनगर, शिवाजीनगर येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार राज मॉल आनंदनगर येथे पोहचले. घडलेल्या घटनेची इम्तिभुत माहिती घेवून पुढील कार्यवाही सुरू आहे. या संदर्भाने विमानतळ पोलीस निरिक्षकांनी सांगितले की, या घटनेचा छडा आम्ही लवकरात लवकर लावू आणि मारेकऱ्यांना जेरबंद करू.
आम्हाला प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार मित्रांच्या आपसातील छोट्या-छोटया भांडणातून हा खूनाचा प्रकार घडला आहे. ज्यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन बालकाचा जिवघेतांना मारेकऱ्यांनी चाकुचा वापर करून त्याच्या शरीरावर हल्ला केल्यानंतर तो जागीच मरण पावला आहे. पाहुया या घटनेचा छडा कधी लागतो.