माळाकोळी पोलीस 8 वर्षीय बेपत्ता बालिकेचा शोध घेत आहेत

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे माळाकोळीच्या हद्दीतून गायब झालेल्या 8 वर्षीय बालिकेसंदर्भाने माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप मात्र बालिकेचा शोध लागलेला नाही.
दि.20 जानेवारी रोजी पोलीस ठाणे माळाकोळीच्या हद्दीत राहणाऱ्या एका 8 वर्षीय बालिकेच्या वडीलांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बालिका ही आपल्या मामाच्या घरी असतांना कोणी तरी तिला पळवून नेले आहे. या संदर्भाने कोणतीही स्पष्टता नसली तरी बालिकेचे वय 8 वर्ष असल्यामुळे गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे माळाकोळी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 15/2025 दाखल केला आहे. आपल्या कौशल्याला वापरून माळाकोळी पोलीस त्या बालिकेचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!